पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (गुरूवार) पंतप्रधान मोदींच्या दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत, मुख्यमंत्र्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “जर राज्यांना बोलण्याची परवानगी नव्हती तर त्यांना का बोलावण्यात आलं? बोलण्यास परवानगी न देण्यात आल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा.”

तसेच, राज्यात म्युकोमायकोसीसचे चार रूग्ण आढळले आहेत. पश्चिमबंगालमध्ये लसीकरणाचा दर कमी आहे. आमचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे, मृत्यू दर ०.९ टक्के आहे. अशी देखील यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी माहिती दिली.

Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दहा राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद, म्हणाले…

पंतप्रधान मोंदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, केरळ, ओदिशा, पुद्दुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि काही अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान या राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ऑनलाईन चर्चेत सहभागी झाले होते.