मध्यप्रदेशात पोट निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. काँग्रेस पक्षातर्फे या निवडणुकांसाठी जोर लावण्यात आला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे.

पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधीनी प्रचार करण्य़ावर ग्वाल्हेर भाजपाचे नेते जयभान सिहं पवैया यांनी भाजपासाठी ही चांगली गोष्ट आहे. त्याचीच आम्ही वाट पाहत आहोत असे म्हटले आहे. “प्रियंका आमच्यासाठी आव्हान नाही तर काँग्रेससाठी पनौती आहेत. आम्ही वाट पाहत आहोत भाऊ बहिणीपैकी कोणी तरी इथे येईल. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो. प्रियंका उत्तर प्रदेशात गेल्याने जे झाले तसेच मध्य प्रदेशातही व्हावे” असे जयभान सिहं यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

मध्य प्रदेशातील पोट निवडणुकींसाठी प्रियंका गांधी भाजपात गेलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मतदारसंघात प्रचार करणार आहेत. मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूकांमुळे  एकीकडे कमलनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना जनतेचे असलेले समर्थन सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणूका महत्त्वाच्या ठरणार आहेत.