News Flash

‘आम्हाला तुमचा अभिमान’, DRDO चं आणखी एक महत्त्वपूर्ण यश

या चाचणीमुळे नजीक भविष्यात....

‘आम्हाला तुमचा अभिमान’, DRDO चं आणखी एक महत्त्वपूर्ण यश
(फोटो सौजन्य - twitter.com/rajnathsingh)

लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. डीआरडीओने लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

अहमदनगरच्या केके रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली. “नजीक भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या डीआरडीओच्या टीमचा भारताला अभिमान आहे” असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल अहमदनगर येथे यशस्वी चाचणी केल्याचे डीआरडीने मंगळवारी जाहीर केले होते. एमबीटी अर्जुन रणगाडयावरुन डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने तीन किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 5:05 pm

Web Title: rajnath singh congratulates drdo for successfully test firing anti tank missile dmp 82
Next Stories
1 ऑक्सिजन सिलिंडरशिवाय १० वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या रीता शेर्पा यांचे निधन
2 CAA विरोधी आंदोलनातील चेहरा टाइम्स मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत
3 गोल्डन गर्ल: फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह ‘राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट