संसदेत आता भाजपला बहुमत मिळाल्याने राम मंदिर उभारणीचे आश्वासन त्यांनी पूर्ण करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
१९९९ ते २००४ दरम्यान भाजप सत्तेत असताना या प्रकरणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सातत्याने आघाडीच्या राजकारणाचा दाखला देत, राम मंदिर उभारणी करण्यात अडचण असल्याचे स्पष्ट करत होते. मात्र आता परिस्थिती भिन्न आहे.
नरेंद्र मोदी सरकारला बहुमत आहे. त्यामुळे त्यांनी अधिकाराचा वापर करून मंदिर उभारणी करावी, अशी अपेक्षा विहिंपचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांनी व्यक्त केली. राम मंदिराचा मुद्दा ही श्रद्धेशी निगडित बाब आहे, त्यामुळे न्यायालय याचा निवाडा करू शकत नाही अशी विहिंपची भूमिका राहिल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संसदेनेच याबाबत कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.