17 January 2021

News Flash

अखिलेश यादव यांचा बदलला सूर!; आता म्हणतात लसीकरणाची तारीख लवकर घोषित व्हावी

मी लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आमचा विश्वास नाही, असं कालच म्हणाले होते.

संग्रहीत

करोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी, अशी सर्वजण प्रार्थना करत असताना, दुसरीकडे या वॅक्सीनवरून राजकारणही सुरू झाल्याचं दिसत आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काल(शनिवार) वॅक्सीन संदर्भात एक अजब विधान केलं होतं. “मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपाच्या लसीवर आम्ही कसा विश्वास ठेवू?” असं ते म्हणाले होते. मात्र यानंतर त्यांच्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्याने, त्यांनी आज आपला सूर बदलल्याचं दिसत आहे.

“करोना लसीकरण ही एक संवेदनशील प्रक्रिया आहे. त्यामुळे भाजपा सरकारने याला कोणताही सजावटीचा-दिखावा करणारा इव्हेंट समजू नये आणि अगोदरच सर्व व्यवस्था करून याची सुरूवात करावी. हा लोकांच्या जीवनाचा विषय आहे, शेवटी यामध्ये नंतर सुधारणांचा धोका नाही पत्कारता येत. गरिबांच्या लसीकरणाच्या निश्चित तारखेची घोषणा व्हावी.” असं आज अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे.

तसेच, “आम्हाला शास्त्रज्ञांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु भाजपाची टाळी-थाळीवाली अवैज्ञानिक विचारसरणी व भाजपा सरकारच्या वॅक्सीन देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास नाही, जी करोनाकाळात ठप्प झाल्यासारखी आहे.” असं देखील अखिलेश यादव यांनी ट्विट करून टीकाकारांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

तर, “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं अखिलेश यादव यांनी काल म्हटलं होतं.

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? – अखिलेश यादव

समाजवादी पार्टीचे मिर्झापूर येथील आमदार आशुतोष सिन्हा यांनी देखील आज(रविवार) करोना वॅक्सीनबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

कोविड-19 वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसकही होऊ शकता, काहीपण होऊ शकतं – आशुतोष सिन्हा

“कोविड-19 वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.” असं खळबळजनक विधान आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.

मोठी बातमी! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती

दरम्यान, भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 11:48 am

Web Title: the fixed date for vaccination of the poor should be declared akhilesh yadav msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मोठी बातमी! कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापराची संमती
2 Coronavirus – देशात मागील २४ तासांत २० हजार ९२३ जण करोनामुक्त, २१७ रुग्णांचा मृत्यू
3 कोविड-19 वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसकही होऊ शकता, काहीपण होऊ शकतं – आशुतोष सिन्हा
Just Now!
X