News Flash

रेल्वेचा प्रवास टुथपेस्ट आणि चहा पावडरपेक्षा स्वस्त; अधिकाऱ्यांची सुरेश प्रभूंपुढे कैफियत

वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा रेल्वे प्रवासाचे दर खूपच कमी असल्याचे गाऱ्हाणे मांडत रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभूंसमोर रेल्वे तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रेल्वेच्या जास्त वर्दळ

रेल्वे मंत्रालयाने लगेचच त्याच्या विनंतीची दखल घेत पीएनआर नंबर आणि इतर माहिती मागून घेतली

वाहतुकीच्या इतर साधनांपेक्षा रेल्वे प्रवासाचे दर खूपच कमी असल्याचे गाऱ्हाणे मांडत रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभूंसमोर रेल्वे तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रेल्वेच्या जास्त वर्दळ असलेल्या मार्गांवरील जनरल आणि स्लीपर कोचच्या प्रवासाची बसशी तुलना केल्यास दोन्हींच्या तिकीट दरांत खूप मोठी तफावत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दिल्ली ते चंदीगढ या सर्वात कमी प्रवासी भाडे असणाऱ्या मार्गावरील तिकीटाचे दर दैनंदिन वापरातील टुथपेस्टपेक्षाही कमी आहेत. याशिवाय, चेन्नई-कोलकत्ता या १,६६२ किलोमीटरच्या प्रवासासाठीचा तिकीट दर एक किलो चहा पावडरच्या किंमतीइतका आहे. रेल्वे तिकीटांची तुलना होणाऱ्या अशा तब्बल २० गोष्टींची जंत्रीच अधिकाऱ्यांनी सुरेश प्रभूंसमोर सादर केली. भारतीय रेल्वेला सध्या प्रवासी सेवेत तब्बल ३२ हजार कोटींची तोटा होत आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. मात्र, सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, हे धुंडाळण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या या वाढत्या दबावामुळे मे महिन्यातील निवडणुकांनंतर रेल्वेच्या तिकीट दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2016 12:19 pm

Web Title: toothpaste costs more than train travel rail officials to suresh prabhu %e0%a4%9f
Next Stories
1 पंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका एकाचवेळी घ्या, मोदींचा प्रस्ताव
2 गर्भपात करणाऱ्या महिलांना शिक्षा झाली पाहिजे- ट्रम्प
3 दहशतवादाविरोधात एकजूट व्हा; ब्रसेल्समध्ये मोदींचे आवाहन
Just Now!
X