News Flash

ममतांवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप

ममता पदाचा गैरवापर करीत असल्याची तक्रार त्यांनी केली.

(संग्रहित छायाचित्र)

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत असतानाच; नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथील भाजपच्या एका नेत्याला तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी आणि आपल्याला जिंकण्यात मदत करण्यासाठी त्याची खुशामत करत असल्याची ऑडिओ क्लिप भाजपने शनिवारी जारी केल्यामुळे तेथे मोठा वाद उफाळला आहे.

भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ही टेप सोपवली. ममता पदाचा गैरवापर करीत असल्याची तक्रार त्यांनी केली.

बॅनर्जी यांनी स्वत: मला फोन करून नंदीग्राममध्ये जिंकण्यात मदत करण्यास सांगितले, असा दावा अधिकारी कुटुंबाबद्दल निष्ठा बाळगणारे पूर्वी मिदनापूरमधील भाजपचे पदाधिकारी असलेले पाल यांनी केला. ‘दीदी, तुम्ही मला फोन केला हा माझा सन्मान आहे. मात्र जे कठीण परिस्थितीतही माझ्या पाठीशी उभे राहिले, त्या अधिकारी बंधूंना मी फसवू शकत नाही,’ असे पाल म्हणत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 1:05 am

Web Title: west bengal polling for 30 assembly constituencies in the first phase akp 94
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि टीएमसीमध्ये ऑडिओ वॉर; राजकीय वातावरण आणखीन तापले
2 निर्गुंतवणूक किंवा कंपनी बंद करणे हे दोनच पर्याय, एअर इंडियाच्या भविष्यावर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचे वक्तव्य
3 सचिनच्या करोना पॉझिटिव्ह ट्वीटनंतर पीटरसनने केला सवाल, त्यावर युवराजने त्याला विचारले…
Just Now!
X