26 October 2020

News Flash

खोटं बोलण्याबद्दल पश्चाताप वाटतो का? ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारणारे पुणेकर शिरीष दाते कोण आहेत?

शिरीष दाते यांनी काय टि्वट केलं?

संग्रहित छायाचित्र

अमेरिकन जनतेबरोबर तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रश्न विचारुन पुणेकर शिरीष दाते यांनी सर्वांनाच धक्का दिला. दाते यांच्या या प्रश्नाने व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षात उपस्थित असलेले सगळेच जण काही क्षणासाठी स्तबद्ध झाले. भारतीय-अमेरिकन वंशाचे शिरीष दाते मूळचे पुणेकर आहेत. पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला आहे. हफिंगटन पोस्टसाठी ते व्हाइट हाऊस प्रतिनिधी म्हणून काम करतात. “मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का?” असा प्रश्न दाते यांनी विचारला. त्यांचा हा प्रश्न ट्रम्प यांच्यासाठी प्रचंड अडचणीचा ठरला.

कोण आहेत शिरीष दाते?
सीएनबीसी टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, वॉशिंग्टन स्थित शिरीष दाते मागच्या २५ वर्षांपासून पत्रकारीतेच्या क्षेत्रात आहेत. त्यांच्या लिंकडिन प्रोफाइलनुसार एनपीआर आणि एपी या अमेरिकन माध्यमांसाठी त्यांनी काम केले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स या विषयात दाते यांनी पदवी घेतली आहे. ‘फायनल ऑरबिट’ नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेनंतर दाते यांनी मागच्या पाच वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता असे टि्वट केले आहे. दाते यांनी जो प्रश्न विचारला, त्याबद्दल ट्रम्प यांच्या विरोधकांकडून त्यांचे समर्थन करण्यात येत आहे.

दाते यांच्या प्रश्नावर ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया होती?
मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का? असा प्रश्न विचारला. पत्रकाराकडून असा प्रश्न आल्यानंतर ट्रम्प थोडे अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले. ट्रम्प यांच्यासाठी हा प्रसंग अजिबात धक्कादायक नव्हता. कारण यापूर्वी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदांमध्ये ट्रम्प यांचा पत्रकारांबरोबर अनेकदा वाद झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:18 pm

Web Title: who is shirish date indian origin journalist who asked trump if he regrets all his lies dmp 82
Next Stories
1 स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींकडून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा
2 सार्वजनिक शौचालयात जात असताना अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार
3 बिहारमध्ये भाजपासमोर नवं राजकीय संकट; ‘कालिदास’ संबोधल्यानं जदयू, लोजपात बिनसलं
Just Now!
X