जगभरात भीतीचं सावट निर्माण केलेला करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन भारतातही दाखल झाला असून कर्नाटकात दोन रुग्ण आढळले आहेत. यामधील एक रुग्ण दुबईला निघून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असताना दुसरीकडे दुसरा ४६ वर्षीय रुग्ण हा कुठेही फिरण्यासाठी बाहेर गेलेला नसतानाही त्याला लागण झाल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, तो कुठेही फिरायला गेला नव्हता.

Omicron Variant : दक्षिण अफ्रिका ते भारत… कसा पसरला ओमायक्रॉन?

कर्नाटकमधील ४६ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली असून तो आरोग्य कर्मचारी आहे. २२ नोव्हेंबरला नमुन्यांची चाचणी केली असता त्याला लागण झाली असल्याची स्पष्ट झालं. २१ नोव्हेंबरला त्याला ताप आणि अंगदुखीसारखं लक्षणं जाणवत होती. यानंतर त्याने २२ नोव्हेंबरला रुग्णालयात जाऊन आरटीपीसीआर चाचणी करुन घेतली. दुपारी चार वाजता रिपोर्ट आले असता ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर हे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले.

Omicron India : देशातल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाने खाजगी लॅबच्या अहवालाच्या आधारे दुबईपर्यंत केला प्रवास; कर्नाटक सरकारची माहिती

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत त्याला घऱी विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. यानंतर २५ नोव्हेंबरला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांच्या उपचारानंतर २७ नोव्हेंबरला त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

माहितीनुसार, ही व्यक्ती प्राथमिकपणे १३ जणांच्या आणि इतर २०५ जणांच्या संपर्कात आली होती. “२२ आणि २५ नोव्हेंबरदरम्यान पहिल्या १३ जणांमधील तिघे आणि इतर दोघे चाचणीदरम्यान पॉझिटिव्ह आढळले. सर्वांना विलगीकरणाता ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती पालिकेने दिली आहे.

देशात ओमायक्रॉनचा शिरकाव ; कर्नाटकात दोन रुग्ण : भयभीत होऊ नका, नियम पाळा; केंद्राचे आवाहन

याशिवाय दक्षिण आफिक्रेतून परत आलेल्या एका ६६ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यांनी करोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवत दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला होता. पण २० नोव्हेंबरला बंगळुरु विमानतळावर चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे ते दुबईला निगून गेले आहेत.

मात्र या दोन्ही केसेसचा एकमेकांशी काहीही संबंध नाही अशी सरकारी सूत्रांची माहिती आहे. यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती मिळवण्यात आली असून त्यांची चाचणी केली जात असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दोन्ही प्रकरण गंभीर नसून रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नव्हती असंही सांगण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे दोघांनीही लसीचे दोन्ही डोस घेतले होते.