BR Ambedkar religious choice: कर्नाटकमधील शिग्गाव विधानसभेचे माजी आमदार सईद आझमपीर खादरी यांनी सोमवारी कर्नाटकमध्ये बोलतना म्हटले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम स्वीकारण्यास तयार होते”. शिग्गाव येथे पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसने याठिकाणी यासिर अहमद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एका सभेत बोलत असताना सईद खादरी यांनी म्हटले की, आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारण्यास तयार झाले होते. मात्र नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आंबेडकरांनी जर इस्लाम धर्म स्वीकारला असता तर संपूर्ण दलित समाज त्यांच्या पाठोपाठ इस्लाम स्वीकारता झाला असता.

सईद आझमपीर खादरी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, आज जे प्रमुख दलित नेते आहेत, त्यांचीही नावे ही इस्लाम धर्मावरून पडली असती. जसे की, आर.बी. थिम्मापूर हे कदाचित रहीम खान झाले असते. डॉ. जी. परमेश्वर हे कदाचित पीर साहब, एल. हनुमंता हे कदाचित हसन साहब आणि मंजुनाथ थिम्मापूर हे कदाचित बडोसाहब या नावाने ओळखले गेले असते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

दलित आणि मुस्लीम समुदायामध्ये ऐतिहासिक असे नाते असल्याचेही सईद यांनी पुढे सांगितले. मुस्लिम दर्गा आणि दलित समाजाची प्रार्थना स्थळे यात साधर्म्य असल्याचेही त्यांनी म्हटले. सईद खादरी यांचे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे. यानंतर काँग्रेसने मात्र या विधानापासून हात झटकले आहेत. खादरी यांना काँग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यामुळे ते आता अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवत आहेत.

खादरी यांचे विधान व्हायरल होताच भाजपाने खादरी आणि काँग्रेसवर जोरदार टीक केली आहे. तसेच खादरी यांना आंबेडकरांच्या इतिहासाबाबत फारशी माहिती नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Story img Loader