Atul Subhash suicide case : बंगळुरूमधील ३४ वर्षीय अभियंता अतुल सुभाष यांनी पत्नी निकीता आणि तिच्या कुटुंबियांकडून छळ झाल्याचा आरोप करत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची सध्या संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे. यादरम्यान अतुल सुभाष यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी गुगल ड्राइव्ह लिंकवर शेअर केलेल्या काही फायली गूढ रीतीने गायब झाल्या आहेत.

गुगल ड्राइव्हमधू गायब झालेल्या फाइलींमध्ये अतुल यांच्या २४ पानांचे सुसाईड नोट आणि ‘टू मिलॉर्ड्स’ नावाने न्यायाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पत्राचा समावेश आहे.

प्रशासकीय यंत्रणांनी अद्याप या मुद्द्यावर भाष्य केले नाही. मात्र काही सोशल मिडिया पोस्ट्समध्ये हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अतुल यांनी शेअर केलेल्या ड्राइव्हमध्ये आता डेथ नोज नो फिअर (Death Knows no Fear) नावाची एक कविता, राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेले एक पत्र आणि पत्नी निकिताने केलेल्या कोणत्याही आरोपासाठी तो दोषी नाही यासंबंधीचे घोषणा पत्र दिसून येत आहे. या फायली यापूर्वीही ड्राइव्हमध्ये होत्या.

अनेक सोशल मिडिया पोस्टमध्ये गुन्हा दडवला जात असून पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोप करत बंगळुरू पोलीसांनी प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. ज्या लोकांनी या फायली आधी डाऊनलोड केल्या होत्या त्यांनी त्या इतरांना पाहाता येतील यासाठी वेगवेगळ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केल्या आहेत.

तर काही जणांनी प्रशासकीय यंत्रणांनी गुगलला या फाइल ड्राइव्हमधून काढून टाकण्यास सांगितल्याचा आऱोप केला आहे. मात्र या प्रकरणावर पोलीस किंवा गुगलकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

मागच्या सोमवारी अतुल सुभाष हे त्यांच्या बंगळुरू येथील घरात मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यांच्या घरात एक विस्तृत सुसाईड नोट सापडली होती. मृत्यूच्या आधी त्यांनी गुगल ड्राइव्हवरती सुसाईड नोट आणि इतर सामग्री शेअर केला होती. या गुगल ड्राइव्हचा एक्सेस सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता. याबरोबरच अतुल सुभाष यांनी ८० मिनिटांच्या एका व्हिडीओमध्ये त्यांचा संपूर्ण अनुभव सांगितला होता.

भावाच्या मृत्यूनंतर अतुल यांचा भाऊ बिकास कुमार यांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला. निकीता आणि तिची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिघांनिया यांना अटक करण्यात आली आहे. तर तिचा चुलचा सुशिल सिंघानिया हा फरार आहे. तीनही आरोपींनी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अतुल यांच्या वडिलांकडून त्यांच्या नातवाचा ताबा मिळावा अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा >> Atul Subhash : भाड्याची खोली घेतली पण…; अतुल सुभाष यांच्या आत्महत्येपूर्वी पत्नीनं नेमकं काय केलं? पोलिसांचा मोठा खुलासा

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण काय आहे?

अतुल सुभाष यांनी पत्नी निकीता, सासू निशा सिंघानिया आणि निकिताचा भाऊ अनुराग सिंघानिया, काका सुशिल सिंघानिया यांच्यावर छळाचे आरोप केले होते. अतुल सुभाष (वय ३४) हे बंगळुरूमधील ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होते. अतुल यांनी ९ डिसेंबर रोजी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला असून २४ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी आपल्या शेवटच्या १२ इच्छा व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते. न्यायालयीन प्रक्रियेला कंटाळून अतुल सुभाष यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.सुभाष यांच्याविरोधात खून, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्ह्यात अतुल सुभाष यांच्या कुटुंबियांचीही नावे दाखल झाली होते. दरम्यान अतुल यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून या प्रकरणी संताप व्यक्त होत आहे. तसेच आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.अतुल सुभाष