scorecardresearch

Premium

“लँडिंगच्या ८ मिनिटं आधी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला”, गृहमंत्र्यांनी लोकसभेतील निवेदनात सांगितला घटनाक्रम!

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला.

rajnath singh on bipin rawat helicopter crash
राजनाथ सिंह यांनी लोकसभेत हेलिकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सांगितला.

देशाचे पहिले सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झालं. या अपघातात बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ जणांचं दुर्दैवी निधन झालं असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताविषयी आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी नेमकं अपघातावेळी काय घडलं, याविषयी देखील लोकसभेत सविस्तर माहिती दिली.

अवघ्या २० मिनिटांत हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोचणार होतं. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

जंगलातून धूर येताना दिसला!

दरम्यान, काही स्थानिकांना जंगलातल्या एका भागातून धूर येताना दिसल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. “जंगलात काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. ते धावत तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकानं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जितक्या लोकांना वाचवणं शक्य होतं, त्यांना लागलीच वेलिंग्टनच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात १४ पैकी १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

Gen Bipin Rawat: “हेलिकॉप्टर झाडांना धडकलं, स्फोट झाला; काहींनी उड्या मारल्या, पण…”; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम

तपास पथकानं चौकशी सुरू केली

दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. “एअर चीफ मार्शल यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. इंडियन एअरफोर्सकडून एअर मार्शल मानिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पथकानं कालच वेलिंग्टनला पोहोचून आपलं काम सुरू केलं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि इतर सर्व सहकाऱ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील”, असं राजनाथ सिंह म्हणाले.

ग्रुप कॅप्टन लाईफ सपोर्टवर

हेलिकॉप्टर अपघातात १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वेलिंग्टन लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. या अपघातात रावत आणि त्यांच्या पत्नीसह ब्रिगेडीयर एल. एस. लिड्डेर, ले. कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पी. एस. चौहान, के. सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक, लान्स नायक बी. एस. तेजा, हवालदार सतपाल यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हेलिकॉप्टर अपघातापूर्वी शेवटच्या काही क्षणांचा व्हिडीओ एएनआयनं ट्वीट केला असून त्यामध्ये हेलिकॉप्टर मोठा आवाज करत जंगलाच्या दिशेने जात असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये काही स्थानिक देखील दिसत आहेत.

हवाई दलाने हेलिकॉप्टरमधील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला असून त्याच्या आधारे हेलिकॉप्टर दुर्घटनेचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cds bipin rawat helicopter crash defense minister rajnath singh in loksabha pmw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×