कर्नाटकातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता राज्य भाजपा अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

येडियुरप्पा यांनी भाजपाच्या बैठकीस जाण्याअगोदर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता आमची भाजपाच्या आमदारांची बैठक आहे व आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. उद्या आमचे सर्व कार्यकर्ते निदर्शनं करणार आहेत. कारण, काँग्रेस-जेडीएस सरकारने त्यांच बहुमत गमावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यायला हवा. हीच जनभावना देखील आहे.

https://twitter.com/ANI/status/1148199086073548800

जेव्हा त्यांनी आत्मविश्वासच गमावला आहे. मग त्यांना कोणताही व्यवहार करण्याचा नैतिकदृष्ट्या अधिकार नाही. म्हणुनच आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. असेही बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.