पीटीआय, लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणात अटक होऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी खान यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. इम्रान समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली तसेच पाण्याचे फवारे सोडले. या वेळी इम्रान यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली.

पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष असलेल्या खान यांच्या झमन पार्क निवासस्थानाकडे जाणाऱ्या चिलखती वाहनामागून पोलीस जात असल्याचे वृत्तवाहिन्यांवर दिसून आले. इस्लामाबाद पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वेळी सांगितले की, तोशाखाना प्रकरणात खान यांना अटक करण्यासाठी आमचे पथक जात आहे. इम्रान यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत सरकारी तोशाखान्यातील वस्तू सवलतीच्या दरात खरेदी केल्या आणि त्या विकून नफेखोरी केली, असा आरोप आहे. 

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

पोलिसांचे पथक इम्रान यांच्या निवासस्थानाजवळ येताच पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलीस आणि काही कार्यकर्तेही जखमी झाले. पक्षाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून कार्यकर्त्यांना येथे शांततेत जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. पीटीआयचे वरिष्ठ नेते फारुख हबिबी यांनी वार्ताहरांना सांगितले की, कोणत्याही स्थितील खोटय़ा आरोपांखाली इम्रान खान हे पोलिसांना शरण जाणार नाहीत. एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याच्या प्रकरणातील अटक वॉरंट मंगळवारीच इस्लामाबादमधील न्यायालयाने स्थगित केले आहे. आता कोणते नवे वॉरंट पोलिसांनी आणले आहे ते आम्ही पाहूच. दरम्यान, पीटीआयचे कार्यकर्ते अली बिलाल यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणीही लाहोर पोलिसांनी सोमवारी इम्रान खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकांनी स्वातंत्र्यासाठी लढावे- इम्रान

इम्रान खान यांनी जारी केलेल्या ध्वनिचित्रफीतीत आवाहन केले आहे की, लोकांनी संघर्ष सुरू ठेवावा. मला अटक केले किंवा मी मारला गेलो तरी लोकांनी लढा सुरूच ठेवावा. पाकिस्तानच्या लोकांनी त्यांचे अधिकार आणि स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी लढत राहावे. मला तुरुंगात टाकले तरी लोक गप्प बसतील, असे पोलिसांना वाटते. पण हा समज चुकीचा आहे हे तुम्ही दाखवून द्या. तुम्ही जिवंत लोक आहात हे दिसू द्या, असे खान यांनी म्हटले आहे.

न्यायाधीशांना धमकीप्रकरणी वॉरंटला स्थगिती

गतवर्षी इस्लामाबादमधील एका जाहीर सभेत बोलताना महिला न्यायाधीशांना कथितरित्या धमकावण्यात आल्याच्या प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला मंगळवारी इस्लामाबादमधील न्यायालयाने येत्या १६ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.