आयसिसशी संबंधित दाम्पत्याला अटक

दोघांचा आयसिसशी संबंध असल्याचा संशय आहे.

‘सीएए’विरोधी निदर्शकांना चिथावणी दिल्याचा आरोप

आयसिसशी संबंधित असलेल्या एका काश्मिरी दाम्पत्याला दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केली. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शकांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

जहाँजेब सामी आणि हीना बशीर बेग अशी या दाम्पत्याची नावे आहेत. या दोघांचा आयसिसशी संबंध असल्याचा संशय आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील निदर्शकांना चिथावणी देण्यात या दोघांचा हात होता, असे पोलीस उपायुक्त (विशेष विभाग) प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले.

या दोघांकडे काही आक्षेपार्ह मजकूर असलेले साहित्य सापडले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या दोघांच्या मोबाइलची तपासणी करण्यात येत असून, त्यातून आणखी आरोपींची माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Couple arrested in connection with ics caa index akp

ताज्या बातम्या