इंडोनेशिया या मुस्लीमबहुल देशामध्ये पहिले हिंदू विश्वविद्यापीठ सुरु झाले आहे. इंडोनेशियाची राजधानी बालीमधील डेनपसार येथे हे विश्वविद्यापीठ सुरू झाले असून सुग्रीव असे नाव या विद्यापीठाचे ठेवण्यात आले आहे. देशातील प्रसिद्ध धार्मिक नेते ‘आयगुस्ती बागस सुग्रीव'(I Gusti Bagus Sugriwa)यांच्या नावावरुन ‘आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोओ विदोडो यांनी या विश्वविद्यापीठाचे उद्घाटन केले.
पहिले या विश्वविद्यापीठाचे नाव हिंदू धर्म स्टेट इंस्टीट्यूट होते. पण, ‘मुस्लीमबहुल देशात ‘आय गुस्ती बागस सुग्रीव’ यांनी हिंदू धर्मासाठी केलेले काम, त्यांना हिंदू धर्माच्या संस्कृतीबाबत असलेली जाणीव आणि त्यांची हिंदू धर्माची नीतिमत्ता याबाबत अधिकांश जणांना माहिती मिळावी’ यासाठी विडोडो प्रशासनाने विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे. १९९३ मध्ये हिंदू धर्म अध्यापन करण्यासाठी स्टेट अकादमीच्या धर्तीवर ही संस्था सुरु झाली होती. १९९९ मध्ये त्याचे हिंदू रिलीजन स्टेट कॉलेजमध्ये परिवर्तन झाले आणि २००४ मध्ये ते आयएचडीएनमध्ये बदलले गेले होते. गेल्या शुक्रवारी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर संस्थेचे नवे स्टेट्स जाहीर केले गेले आहे.
इंडोनेशिया हा मुस्लीमबहूल देश असला तरी येथे हिंदू धर्म आदराचा विषय आहे. बाली बेटावर आजही हिंदू मान्यतेप्रमाणे मंदिरातून पूजा अर्चा केली जाते आणि येथे हिंदू धर्माचे अभ्यासक मोठ्या प्रमाणावर आहेत.