अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ४ देशांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या क्वाड्रिलॅटरल डायलॉगने दहशतवादी संघटनांबाबत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच सीमेपलीकडून दहशतवादी कृत्यांचा निषेध केलाय. तसेच दहशतवादी कृत्यांमागे असलेल्या आरोपींना न्यायाच्या कक्षेत आणण्याची मागणी केलीय. पुलवामा हल्ल्याला ३ वर्षे उलटूनही कट रचणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं नेतृत्व पाकिस्तानात सक्रिय असल्याचंही समोर आलं आहे.

२६/११ चा दहशतवादी हल्ला लष्कर-ए-तोयबाने केला, तर पठाणकोट हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद असल्याचं समोर आलं. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सक्रीय असलेल्या या दोन्ही संघटनांचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचं समोर आलंय. याच दहशतवादी संघटनांकडून काश्मीरच्या नावावर भारताला लक्ष्य केलं जातंय. या भागात कट्टरतावादालाही खतपाणी घातलं जात आहे.

असं असलं तरी क्वाडने मुंबई हल्ला आणि पठाणकोट हल्ल्यात थेट पाकिस्तानचं नाव घेणं टाळलं. मसूदच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जैशने शेवटचा हल्ला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे केला होता. यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर देत बालाकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

हेही वाचा : काश्मीर : दोन चकमकींत पाच दहशतवादी ठार; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत ८ दहशतवाद्यांवर कारवाई केली. यात पुलवामाच्या सुसाईड बाँबरचाही समावेश आहे. यातील ७ जण तुरुंगात असून त्यांच्यावर जम्मूमध्ये एनआयए न्यायालयात खटला सुरू आहे.