रशियाने युक्रेनवर हल्ले सुरु केल्यानंतर अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी रशियाला काय निर्यात करता येईल यावर नवीन निर्बंध आणि मर्यादा जाहीर केल्या आहेत. अमेरिकेतील पाच सर्वात मोठ्या रशियन बँकांवर टाच आणली असून त्यांची सर्व मालमत्ता गोठवली जाणार आहे. याची किंमत १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मात्र असं असलं तरी क्रिप्टोकरन्सीचा अवलंब वाढल्याने रशियाला आर्थिक निर्बंधांच्या पहिल्या लाटेपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) निर्बंध लागू करण्यासाठी बँकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. मात्र डिजिटल चलन जागतिक बँकिंग नियमांच्या कक्षेबाहेर असल्याने, क्रिप्टोकरन्सी रशियाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येऊ शकते. युद्धाला सुरुवात झाली तेव्हा क्रिप्टोकरन्सीत घसरण दिसून आली होती. मात्र आता बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात स्थिरता आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, रशिया अमेरिकेच्या निर्बंधांपासून बचाव करण्यासाठी क्रिप्टो करन्सीला कायदेशीर करत आहे. अन्यथा पाश्चिमात्य देशांच्या वाढत्या निर्बंधांच्या दबावाला तोंड देऊ शकणार नाही. FxPro चे वरिष्ठ बाजार विश्लेषक अ‍ॅलेक्स कुप्ट्सिकेविच यांनी सांगितले की, क्रिप्टो करन्सी महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा खरेदीदारांकडून पाठिंबा मिळाला आहे.

युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं अ‍ॅपलच्या सीईओंना खुलं पत्र, म्हणाले “तुम्हाला मान्य करावे लागेल…”

फर्म क्वांटम इकॉनॉमिक्सचे संस्थापक आणि सीईओ मॅटी ग्रीनस्पॅन यांनी ब्लूमबर्गला सांगितले, “जर दोन लोक किंवा संस्था एकमेकांसोबत व्यवसाय करू इच्छित असतील आणि बँकांद्वारे तसे करू शकत नसतील, तर ते बिटकॉइनसह करू शकतात. जर एखाद्या धनाढ्य व्यक्तीला असे वाटत असेल की निर्बंधांमुळे त्याचे खाते बंद होऊ शकते, तर तो हे टाळण्यासाठी त्याचे पैसे बिटकॉइनमध्ये बदलू शकतो.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia will use bitcoin to overcome economic sanctions rmt
First published on: 28-02-2022 at 10:16 IST