scorecardresearch

संसदेतील कामकाजाचं थेट प्रक्षेपण करणारं YouTube चॅनेल टर्मिनेट; युट्यूबने केली कारवाई

जे चॅनेल टर्मिनेट करण्यात आलं आहे त्यावरुनच लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजाचं थेट प्रक्षेपण केलं जातं.

Sansad TV YouTube account
याच चॅनेलवरुन संसंदेमधील कामकाजाचं थेट प्रक्षेपण होतं

राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करणारं युट्यूब चॅनेल टर्मिनेट करण्यात आलं आहे. युट्यूबनेच ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.

युट्यूबच्या माध्यमातून देशभरातील जनतेला संसदेमध्ये नक्की काय कामकाज होतं हे थेट दाखवण्यासाठी संसद टीव्ही नावाचं चॅनेल सुरु करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माध्यमातून हे चॅनेल हाताळलं जातं. मात्र ‘यूट्यूबवरील कम्युनिटी गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यामुळे’ चॅनेल टर्मिनेट करण्यात आलं आहे.

नेमक्या कोणत्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय यासंदर्भातील माहिती गुगलकडून देण्यात आलेली नाही. गुगल या कंपनीकडे युट्यूबची मालकी असून यासंदर्भातील एक ईमेल गुगलला करण्यात आलाय. मात्र त्यावर अद्याप उत्तर देण्यात आलेलं नाही. सकाळी संसद टीव्ही सर्च केल्यानंतर एरर ४०४ नोटीफिकेशन दाखवण्यात येत होतं. तुम्ही शोधत असलेलं चॅनेल उपलब्ध नसल्याचा मेसेज स्क्रीनवर दाखवण्यात येत होता.

युट्यूबच्या धोरणांनुसार या माध्यमावर कोणत्या प्रकराची माहिती असावी याबद्दल काही नियम तयार करण्यात आलेत. हे नियम व्हिडीओ, व्हिडीओंवरील कमेंट, व्हिडीओंचे थम्बनेललाही लागू होतात. मशिन रिव्हू आणि प्रत्यक्ष पहाणीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील कंटेट वेळोवेळी तपासला जातो. यामध्ये नियमांचं काही उल्लंघन होत असल्यास असा कंटेट अथवा चॅनेलवर कारवाई करुन ते टर्मिनेट करणं किंवा काढून टाकण्याची कारवाई केली जाते.

हे नियम सर्वच चॅनेलसाठी असून हे माध्यम सर्वांसाठी अधिक सुरक्षित असावे या उद्देशाने नियम तयार करण्यात आल्याचं युट्यूबचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sansad tv youtube account terminated for violating platform community guidelines scsg

ताज्या बातम्या