देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टला दिल्लीत दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ला केला जाऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. दिल्लीत सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला असून राजधानीला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.

पंजाबसह देशातील इतर राज्यांमधून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीमधून राजधानी दिल्लीत ड्रोन हल्ल्याची योजना आखली जात असल्याचं निष्पन्न झालं होतं. पाकिस्तानच्या सीमेवरून स्फोटकांनी भरलेले ड्रोन भारतात विविध ठिकाणी पाठवण्यात आल्याचं तपासात समोर आलं होतं. पिस्तुल, हँड ग्रॅनेड, AK-47 हे शस्त्रात्रही ड्रोनच्या साहाय्याने भारताच्या सीमेमध्ये दाखल करण्यात आले आहे. धारदार शस्त्र किंवा गाडीच्या मदतीने आत्मघाती हल्लेखोरांकडून हल्ला केला जाऊ शकतो, असा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

दहशतवादी संघटना एसएफजे(SFJ), जैश-ए-मोहम्मद(JEM), आयसीस (ISIS) या संघटनांकडून दिल्लीत घातपात घडवला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. दिल्लीच्या आठही सीमांसह बाजारांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाल किल्ल्यावरील सुरक्षेची विभागणी अनेक स्तरांमध्ये करण्यात आली आहे. या किल्ल्यावर रडार बसवण्यात आला आहे. याशिवाय अलार्म कॅमेरेही ठिकठिकाणी बसवण्यात आले आहे. लाल किल्ल्यात संशयास्पद हालचाल दिसल्यास वाजणाऱ्या अलार्ममुळे पोलिसांना मदत मिळणार आहे.

India-Pakistan Partition: फाळणीवरुन भाजपाचा जवाहरलाल नेहरूंवर निशाणा, भाजपाच्या व्हिडीओवर काँग्रेसकडून पलटवार

ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी अँन्टी ड्रोन यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि डीआरडीओने (DRDO) ही यंत्रणा विकसित केली आहे. ड्रोन हल्ल्यापासून संरक्षणासाठी दिल्ली पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान लाल किल्ला परिसरात पतंग उडवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दहशतवाद्यांना मदतप्रकरणी ‘हिज्बुल’ नेता सलाउद्दीनच्या मुलासह चार कर्मचारी बडतर्फ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीत जवळपास २५० मोठ्या आसामी हजेरी लावणार आहेत. याशिवाय आठ ते दहा हजार दिल्लीकरही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्यावर एक हजार कॅमेरांच्या मदतीनं लक्ष ठेवलं जाणार आहे.