Telangana Thalli : तेलंगणाच्या राजकारणात रेवंथ रेड्डी यांच्या सरकारमध्ये काँग्रेसने तेलंगणा थळ्ळींचा ( Telangana Thalli ) पुतळा उभारला आहे. (तेलंगणा थळ्ळी म्हणजे तेलंगणाच्या जननी अशी मान्यता आहे) दरम्यान या पुतळ्यावरुन वाद पेटला आहे. कारण भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते या विरोधात तेलंगणाच्या उच्च न्यायालयात गेले आहेत. या पुतळ्याचं अनावरण केलं जाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजपाने काय काय आक्षेप घेतले आहेत?

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे. रेवंथ रेड्डी कायमच सोनिया गांधींचा उल्लेख मदर ऑफ तेलंगणा ( Telangana Thalli ) असा करतात यावरुन हा वाद पेटला आहे. या पुतळ्याचा घाट आणि त्यावरील नक्षीकाम यावर भारतीय राष्ट्रीय समितीने आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने तेलंगणाच्या नागरिकांचा अपमान केला आहे असं भाजपाने म्हटलं आहे. भाजपाने असाही आरोप केला आहे की काँग्रेसकडून या पुतळ्यावर त्यांचं पक्ष चिन्ह म्हणजेच हात हा जाणीवपूर्वक दाखवलं गेलं आहे. याऐवजी त्या पुतळ्यावर राज्याचे तपशील किंवा संदर्भ यायला हवे होते.

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”

तेलंगणा थळ्ळी कोण आहेत?

तेलंगणा थळ्ळी यांना लोकांचं प्रतीक मानलं जातं त्यांना तेलंगणाच्या जननी असं म्हटलं जातं. तेलंगणा थळ्ळींचा पहिला पुतळा बी. वेंकटरमणा यांनी निर्मल या जिल्ह्यात उभारला होता. या ठिकाणी भारतीय राष्ट्र समितीचं मुख्यालय आहे. २००३ मध्ये हा पुतळा सर्वात आधी उभारण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री असतानाही या प्रकारचे काही पुतळे ( Telangana Thalli ) उभारण्यात आले होते.

हे पण वाचा- Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?

तेलंगणा थळ्ळी यांना गुलाबी रंगाची साडी नेसवण्यात आली होती

तेलंगणा थळ्ळी यांना गुलाबी रंगाची साडी नेसवण्यात आली होती. तसंच पायात पैंजण होते, लग्न झालेल्या महिलेचं प्रतीक म्हणजे तेलंगणा थळ्ळीची ( Telangana Thalli ) मूर्ती होती. तसंच अनेक दागदागिनेही या देवीच्या पुतळ्यावर होते. सोनेरी कंबरपट्टाही या पुतळ्याला आहे. मात्र नव्या पुतळ्यावर ( Telangana Thalli ) मुकुट नाही. तसंच समृद्धीचं प्रतीक असलेला घटही या पुतळ्याच्या हाती नाही अशी टीका होते आहे. तसंच साडीचा रंगही गुलाबी ऐवजी हिरवा करण्यात आल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. तसंच कंबरपट्ट्यावरची नक्षी बदलण्यात आल्याचाही आरोप होतो आहे.

विरोधी पक्षाचे आक्षेप काय?

BRS ने तेलंगणा थळ्ळींच्या नव्या पुतळ्यावर आक्षेप घेतले आहेत. के. टी. रामा राव यांनी म्हटलं आहे काँग्रेसने पुतळ्यात बदल केले आहेत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही राजीव गांधींचा पुतळा काढून तिथे तेलंगणा थळ्ळींचा पुतळा बसवू. तेलंगणा थळ्ळी यांचा पुतळा मुकुटाशिवाय अत्यंत गरीब दिसतो आहे असंही विरोधकांनी म्हटलं आहे. तसंच भाजपाने या पुतळ्याच्या साडीचा रंग जाणीवपूर्वक बदलला असाही आरोप केला जातो आहे.

Story img Loader