नोएडा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी समाजवादी पक्षावर हल्ला करताना ‘‘उसाचा गोडवा वाढवायचा की पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या अनुयायांचे गैरप्रकार घडू द्यायचे, हे देशाने ठरवावे’’, अशी टीका केली. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिला समारंभात आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते. उत्तर प्रदेश विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत असल्याचा दावा करताना त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. पश्चिम उत्तर प्रदेशासाठी विमानतळाचा कोनशिला समारंभ हा दीर्घ प्रतीक्षेतील आणि महत्त्वाचा क्षण असल्याचे नमूद केले. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड करून या भागातील गोडवा वाढवला. काही लोकांनी मात्र उसाच्या या गोडव्याला दंगलींच्या माध्यमातून गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता उसाचा गोडवा वाढवायचा आहे की मोहम्मद जीना यांच्या अनुयायांचे गैरप्रकार, हे देशाने ठरवावे, असे आदित्यनाथ म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2021 रोजी प्रकाशित
उसाचा गोडवा हवा की जिनांचे अनुयायी ? ; योगी आदित्यनाथ यांची ‘समाजवादी’वर टीका
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिला समारंभात आदित्यनाथ यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-11-2021 at 01:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogi adityanath slams samajwadi party at noida airport event zws