अमेरिकन अंतराळ संस्था नासाकडून विविध अंतराळ मोहिमा काढल्या जातात. २०२५ साली चंद्र आणि मंगळवार अंतळावीर पाठवण्याची नासाची योजना आहे. यापूर्वीही नासाने अनेकदा मानवाला अवकाशात पाठवलं आहे. पण, मानवाला अंतराळात पाठवणं धोकादायक काम आहे. गेल्या ६० वर्षात २० अंतराळवीरांचा अवकाशात मृत्यू झाला आहे.
१९८६ ते २००३ दरम्यान नासा स्पेस शटल दुर्घटनांमध्ये १४, १९६७ साली अपोलो लाँच पॅड फायरमध्ये ३ आणि १९७१ साली सोयुझ मोहिमेत ३ अशा २० अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अवकाशात, चंद्रावर किंवा मंगळवार अंतराळवीरांचं मृत्यू झाला, तर त्यांच्या देहाचं काय केलं जातं? याबद्दल नासाच्या ‘द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉप स्पेश हेल्थ’चे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा : एका परफ्युममुळे बिघडू शकली असती इस्रोची सौरमोहीम ‘आदित्य एल१’; जाणून घ्या रंजक कारण …
इमॅन्युएल उर्क्विएटा म्हणाले, “जर एखाद्या अंतराळवीराचा अवकाशात किंवा पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मृत्यू झाला असेल, तर काही तासांतच त्याचा मृतदेह कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत पाठवता येतो.”
“जर हे चंद्रावर घडले तर बाकीचे अंतराळवीर काही दिवसांत मृतदेह घेऊन येऊ शकतात. यासाठी नासाने प्रोटोकॉल तयार केले आहेत. घाईत कोणताही मृतदेह पृथ्वीवर आणला जात नाही. बाकीचे अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित येण्यास नासाचं प्राधान्य आहे,” असं इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी सांगितलं.
हेही वाचा : चांद्रयान 3, आदित्य L-1 मिशनच्या शास्त्रज्ञांचा पगार किती? ISRO चे शेफ, ड्रायव्हर किती कमावतात? पाहा तक्ता
“समजा मंगळ मोहिमेवर ( ३०० दशलक्ष किलोमीटर ) जाताना एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला, तर गोष्ट वेगळी असेल. तेव्हा अंतराळवीरांचा मृतदेह वेगळ्या चेंबरमध्ये किंवा बॉडी बॅगमध्ये ठेवतात,” अशी माहिती इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी दिली. ‘एनडीटीव्ही वर्ल्ड’ने याबाबत वृत्त दिलं आहे.