TV Show Shooting: टीव्हीवर दररोज अनेक मालिका येत असतात. काही काळ तुमचे मनोरंजन केल्यानंतर या मालिकांचा भाग संपतो, त्यानंतर पुढचा भाग दुसऱ्या दिवशी प्रसारित केला जातो. तुम्ही फक्त एका तासात संपूर्ण एपिसोड पाहता, पण हा एक भाग शूट करायला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहीत आहे का? शूटिंगनंतर कलाकारांच्या पोशाखांचे काय होते? कदाचित अनेक वेळा असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. आज आम्ही तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

एका एपिसोडमध्ये इतका वेळ लागतो..

टीव्हीवर काम करण्याची पद्धत आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. टीव्ही इंडस्ट्रीतील शूटिंगचे काम चित्रपटांपेक्षा खूप वेगळे असते. टीव्ही मालिका कलाकार सांगतात की, टीव्ही सीरियलच्या शूटिंगमध्ये डेली सोप असतात आणि त्यांचे शूट बहुतेक इनडोअर असतात. ज्यामध्ये लोकेशन एकच असते आणि त्याठिकाणी लाइटिंगचा देखील सेटअप असतो. आजकाल तीन कॅमेऱ्यांनी शूटिंग सुरू केले आहे, त्यामुळे एका दिवसात एक एपिसोड आरामात शूट होतो. त्याच वेळी, काही शोज ज्यामध्ये VFX चा भरपूर वापर केला जातो, जसे की नागिन किंवा क्राईम शो, ज्यामध्ये बहुतांश शूटिंग बाहेरच होते, अशा शोचे शूटिंग होण्यासाठी किमान ३ ते ४ दिवस लागतात.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

शुटिंगच्या वेळीच डायलॉग्स कळतात..

आठवड्यातून पाच ते सहा दिवस येणार्‍या सीरिअलचं शूटिंग सतत चालू असतं. यातील २-३ एपिसोड्स बॅकअपमध्ये ठेवलेले असले तरी अनेक पात्रे जागेवरच हजर असल्याने शूटिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे शूटिंग सतत सुरू राहते. या शोची स्क्रिप्ट अनेक महिने अगोदर लिहिली जात असली तरी संवाद शूटिंगच्या वेळीच कळतात. टीआरपी आणि चॅनलच्या पॉलिसीच्या आधारे यामध्ये बदल होत राहतात. प्रत्येक आठवड्याच्या टीआरपीच्या आधारे पुढील आठवड्याचे काम ठरवले जाते.

( हे ही वाचा: साप चंदनाच्या झाडाला लिपटून का असतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

कपड्यांचे काय होते?

टीव्ही सीरियलमध्ये परिधान केलेले कपडे प्रोडक्शन हाऊसकडून दिले जातात. बहुतेक कपडे कलाकारांच्या मापानुसार बनवले जातात. तर अभिनेत्रींचे ब्लाउज कॉमन साइजचे असतात. शूटिंगपूर्वी ते अल्टर केले जातात. प्रोडक्शनचा जास्तीत जास्त खर्च कपड्यांवर होतो. शूटिंगनंतर, हे कपडे पॅक करून ठेवले जातात आणि पुढील शूटसाठी साइट कॅरेक्टर्सना मिक्स आणि मॅच करून घालायला दिले जातात.