Onam Sadhya : ओणम सद्यामध्ये पोळीचा समावेश झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. काही जण यावर टीका करत आहेत तर काही जणांनी पोळीचा समावेश करण्याला काही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. आपण जाणून घेणार आहोत ओणम सद्या ( Onam Sadhya ) आहे काय?

ओणम हा केरळमधला सर्वात मोठा महोत्सव

ओणम हा केरळमधला सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव आहे. त्यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे ‘ओणम सद्या’ ( Onam Sadhya ) केळीच्या पानावर पायसम, पचडी, आंबील, भात तसंच सार वाढलं जातं, काही महत्त्वाच्या गोड पदार्थांचाही त्यात समावेश असतो. राजा महाबली नावाचा एक राजा केरळच्या संस्कृतीत होऊन गेला. तो जेव्हा परत आला होता तेव्हा लोकांनी ओणम साजरा करायला सुरुवात केली. जी परंपरा केरळात आजही कायम आहे. तसंच विष्णूची पूजाही याच काळात केली जाते. दरवर्षी मल्याळी दिनदर्शिकेनुसार चिंगम नावाच्या महिन्यात म्हणजेच इंग्रजी सप्टेंबर महिन्यात हा महोत्सव साजरा केला जातो. ओणम महोत्सव सुरु झाला आहे आणि १५ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Increase in marigold flower prices during Ganeshotsav 2024
गणेशोत्सवात झेंडू दराने गाठली शंभरी; पावसामुळे झेंडूच्या उत्पादनात घट
short story on potholes on road in monsoon season
विक्रमवेताळ आणि खड्डे पुराण
Ganeshotsavs first day gold prices in Nagpur fell but surged over next seven days
नागपूर: ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ… असे आहेत आजचे दर…
sound speaker health issue marathi news
सावधान! गणेशोत्सवात ढोल-ताशा, डीजे, स्पीकरच्या भिंतीजवळ जाताय… आधी धोके जाणून घ्या…
ganeshotsav liquor ban pune marathi news,
शहरबात: गणेशोत्सवातील मद्यबंदी
ganeshotsav noise pollution pune marathi news,
पुण्यात गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचाच ‘आव्वाज’! कमाल मर्यादा पातळीचा सर्वत्र भंग; दोनशे मंडळांच्या ठिकाणी तपासणी

ओणम सद्या थाळीचं दहाव्या दिवशी महत्त्व

ओणम हा सांस्कृतिक महोत्सव खूप सुंदर असतो. ओणम सद्या ( Onam Sadhya ) ही थाळी दहाव्या दिवशी सजवण्यात येते. राजा महाबलीच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ हा सोहळा साजरा केला जातो. यामध्ये २४ ते २६ पदार्थ तयार केले जातात आणि सगळे केळीच्या पानावर ( Onam Sadhya ) वाढले जातात.

ओणम सद्यामध्ये काय पदार्थ वाढले जातात?

सांबार, परिप्पू आमटी, डाळीची भाजी, भात, तूप, पापड, अवियल, थोरन, ओलान, दूधी आणि नारळाची आमटी, मोरु करी, पचडी, पायसम आणि गूळ, नारळ आणि तांदूळ यांपासून तयार केले गेलेले गोड पदार्थ, विविध चटण्या अशा जवळपास २६ पदार्थांचा समावेश या थाळीत ( Onam Sadhya )असतो.

ओणम सद्या थाळी पोळीमुळे चर्चेत

ही सगळी थाळी केळीच्या मोठ्या पानावर वाढली जाते. ती हाताने खाण्याची परंपरा आहे. या वर्षी या ओणम सद्या थाळीत पोळीचा समावेश करण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोळी ही उत्तर भारतात जास्त खाल्ली जाते त्यामुळे ती दक्षिणेच्या या खास थाळीत का आणली असा प्रश्न ओणम सद्या या थाळीबाबत उपस्थित होतो आहे. ओणम सद्या ही एका खास महोत्सवाची पवित्र पारंपरिक थाळी आहे, केरळच्या संस्कृतीचं दर्शन यात होतं. या थाळीमध्ये पोळीचं काम नाही अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.