Safest Seat On Plane: दरवर्षी विमानाच्या अपघाताच्या अनेक दुर्दैवी घटना समोर येत असतात. मागील वर्षी नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात ६० हुन अधिक प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या घटनांनंतर विमान प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्या मंडळींनी सुद्धा धसका घेतला असावा. अलीकडेच विमान प्रवासातील सुरक्षा उपाय योजनांची बरीच चर्चा झाली.यात एक मुद्दा अनेक ठिकाणी समोर आला तो म्हणजे विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती? नाही नाही पायलट किंवा केबिन क्रू साठी नव्हे तर या सीट्स प्रवाशांसाठीच उपलब्ध असतात. ही माहिती एकूणच आजवरच्या निरीक्षणावर आधारित आहे त्यामुळे यात अंधश्रेद्धचा भागही नाही. आपणही जर येत्या काळात विमान प्रवास करणार असाल तर या सुरक्षित सीटचा पर्याय निवडण्याचा नक्की विचार करू शकता.

आता थेट मुद्द्यावर यायचं तर, विमानात सर्वात सुरक्षित सीट ओळखण्यासाठी अभ्यासकांनी तब्बल ३५ वर्षांच्या डेटाचे विश्लेषण केली आहे. टाइम्सच्या मॅगझीननुसार विमानातील मागील किंवा मध्य भागातील काही सीट्स या पुढील भागापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. या सीट्स वरील मृतांची टक्केवारी ही २८% इतकी आहे.

टाइम्सने मांडलेल्या आकडेवारीनुसार विमानाचा मध्य भाग व मागील बाजूचा सेंट्रल पॉईंट हा सर्वात सुरक्षित मानला जातो. मात्र १९८५ ते २०२० दरम्यान, ही आकडेवारी उलटच होती. म्हणजेच या काळात झालेल्या अपघातांमध्ये असे दिसून आले होते की, विमानातील मधल्या रांगेतील सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या मृत्यूचा टक्का हा ३९ इतका होता. पुढील रांगेत बसलेल्यांच्या मृत्यूची टक्केवारी ३८ व मागील रांगेत ३२ टक्के इतकी होती. या दोन्ही निरीक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार पुढील व मध्य भागातील सीट्सच्या बाबत धोक्याचे प्रमाण कमी जास्त होत आहे मात्र विमानाची मागील बाजू ही अत्यंत सुरक्षित मानली जाते.

हे ही वाचा<< भारतातच सर्व पंख्यांना तीन पाती का असतात? स्टाईल नाही ‘हे’ आहे खरं लॉजिक, डिझाईन जराही बदललं तर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्स नुसार, ही आकडेवारी निरीक्षण आहे, त्याला दावा मानता येणार नाही. सुरक्षित विमान प्रवासासाठी आपण सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याशिवाय आपत्कालीन स्थितीत सुद्धा प्रत्येक विमान कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सूचना नीट फॉलो करायला हव्यात.