World Hello Day 2023: हॅलो हा शब्द फार सामान्य आहे आणि आपण दररोज हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. कुणाला फोन केल्यानंतर किंवा फोन आल्यानंतर आपण सर्व प्रथम हॅलो म्हणतो. हॅलो हा इंग्रजी शब्द आहे, हा जुना जर्मन शब्द हाला किंवा होलापासून आला आहे. हाला किंवा होलाचा अर्थ हा कसे आहात असा होतो. जसा जसा काळ पुढे जाऊ लागला तसा हा शब्ह होलाहून हालो बनल आणि नंतर हालू झाला. हळूहळू हा शब्द कायमस्वरूपी हॅलो बनला. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की फोनवर बोलताना सर्वात आधी हॅलो हा शब्दच का म्हटला जातो? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात..

टेलीफोनचा शोध कोणी लावला

कॉल करताना हॅलोचा इतिहास जाणून घेण्यापूर्वी हे माहित असावे की टेलीफोनचा शोध कोणी लावला. अलेक्झांडर ग्राहम बेल यांना टेलीफोन बनवण्याचं श्रेय दिलं जातं. त्यांनी १८७६-७७ दरम्यान याचा शोध लावला होता.

अलेक्झांडर ग्राहम बेलने फोनवर प्रथम हॅलो बोलले का?

मीडिया रिपोर्टनुसार ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव मार्गारेट हॅलो असे होते. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर, ग्राहम बेलने आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि तिचे नाव घेत हेलो म्हटले. यानंतर फोनवर हॅलो शब्द म्हणण्याचा ट्रेंड सुरु झाला. परंतु बऱ्याच अहवालांमध्ये असा दावाही केला जातो की ग्राहम बेल आणि मार्गारेट हॅलोची ही काहीणी चुकीची आहे.

मोबाईल असू दे किंवा लँडलाइन फोन वाजताच रिसिव्ह करताच प्रत्येक जण हॅलो म्हणतो. मग तो गरिब असो, श्रीमंत असो, लहान किंवा ज्येष्ठ, स्त्री किंवा पुरुष कोणीही असो हॅलोच म्हटलं जातं. आश्चर्य म्हणजे आज अगदी बहुतेक जगातल्या सगळ्याच देशांमध्ये कॉलवर हॅलो म्हटलं जातं.

हेही वाचा >> गाईंनाही असतात बेस्टफ्रेंड; जाणून घ्या गाईंबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या रंजक गोष्टी 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हॅलो या शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये नाही, तर ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये हॅलो या शब्दाचा अर्थ स्वागत, अभिव्यक्ती, अभिवादन, सलाम असा दिला आहे. म्हणूनच जेव्हा आपण एखाद्याला भेटतो किंवा हस्तांदोलन करतो तेव्हा आपण नमस्कार म्हणतो.