scorecardresearch

Premium

“पनवती कोण आहे ते काँग्रेसला कळलं असेल त्यामुळे आता…”, निवडणूक निकालांवर फडणवीस काय म्हणाले?

भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे, लोकांनी इंडिया आघाडीला नाकारलं आहे हेच निकाल दाखवत आहेत.

What Devendra Fadnavis Said?
देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया

चार राज्यांच्या निकालांमध्ये तीन राज्यांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. हे यश जनतेचा मोदींवरचा विश्वास. जनतेने मोदींवर जो विश्वास दाखवला त्याचंच हे यश आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. सामान्य माणसाच्या मनात हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्यासाठी काम करतं आहे. त्याचं प्रत्यंतर लोकांना पाहण्यास मिळालं हा त्याचा विजय आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पनवती कोण आहे ते आता काँग्रेसला कळलं असेल

या विजयाचं श्रेय खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. तसंच आमचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जी भाजपाची टीम आहे त्या सगळ्यांचं श्रेय आहे. या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एवढंच नाही तर आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळलं असेल. निवडणूक निकालात ते दिसून आलं आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत याची मला खात्री आहे. आम्हाला यश मिळालं की ते ईडी, सीबीआयने दिलेलं यश आहे म्हणायचं आणि त्यांना यश मिळालं की जनतेचा कौल म्हणायचं. या मानसिकतेत जोपर्यंत विरोधक असतील तोपर्यंत ते सत्तेत येणार नाहीत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

congress party income tax
विश्लेषण : राजकीय पक्षांना खरंच आयकर भरावा लागतो? आयकर कायद्यातील नेमक्या तरतुदी काय?
akola district, NCP, Ajit Pawar group, disputes, factionalism
अकोल्यात अजित पवार गटात धुसफूस सुरू, परस्परांवर कुरघोड्या
Ghulam Nabi Azad slams congress
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांची टीका; म्हणाले, “काही अहंकारी…”
sanjay raut on baba siddique
“मुस्लिम समाजात फूट पाडण्याकरता…”, बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या शक्यतेवरून राऊतांची टीका

भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे

भाजपाची मतं ही १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहेत. छत्तीसगडमध्ये १४ टक्क्यांमध्ये मतं वाढली आहेत. मध्यप्रदेशात ८ टक्के मतं वाढली आहेत. जनतेचा विश्वास हा भाजपावर आहे हेच पाहण्यास मिळतं आहे. आत्ताचे कल पाहिले तर ६३९ पैकी ३३९ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. ५० टक्क्यांहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या आहेत. हा निकाल जनतेच्या मनात काय आहे याची नांदी आहे. लोकसभेत जो अभूतपूर्व विजय भाजपाला मिळणार आणि एनडीएला मिळणार आहे त्याची सुरुवात आहे. इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलं आहे. राहुल गांधींचा अजेंडाही लोकांनी नाकारला आहे. लोकांच्या मनात मोदी आहेत. यानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्यात पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जाईल याची खात्री आहे. मात्र जनता मोदींच्या बरोबर आहे हे स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्रात ग्रामपंचायतींमध्येमध्ये दोन तृतीयांश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या. लोकसभेत हेच होणार आहे. महाराष्ट्रात आणि देशात आपल्या भारतीय जनता पार्टीच सत्तेत आलेली पाहण्यास मिळणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dcm devendra fadnavis first reaction on four state election result he gave all credit to pm modi scj

First published on: 03-12-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×