Dombivli Assembly Constituency : भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडी सुरुंग लावणार का? डोंंबिवलीत बहुरंगी लढतीची शक्यता!

BJP vs Maha Vikas Aghadi Dombivli Assembly Constituency : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख आहे. या मतदारसंघात मराठी (खासकरून कोकणी), गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक राहत असल्याने त्यांचं एकगठ्ठा मतदान भाजपाला होत आलं आहे.

Dombivali Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
डोंबिवली विधानसभा मतदारसंघ| डोंबिवली विधानसभा निवडणूक २०२४

Ravindra Chavhan in Dombivli Assembly Constituency : २००९ मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ झाला होता. तेव्हापासून या मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून रवींद्र चव्हाण आमदार राहिले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेलं शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख आहे. या मतदारसंघात मराठी (खासकरून कोकणी), गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक राहत असल्याने त्यांचं एकगठ्ठा मतदान भाजपाला होत आलं आहे.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
three die after bike collides with bus in raigad incident caught on dashcam
Video : रायगडमध्ये बसला दुचाकीची धडक, तिघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद
Raj Thackeray On One Nation One Election
Raj Thackeray : ‘एक देश एक निवडणुकी’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकांचं महत्व एवढंच वाटतंय तर…”
Navi Mumbai Semiconductor project
‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
Eknath Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं बंड चित्रपटानंतर आता मराठी रंगभूमीवर; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!
Aaditya Thackeray On IND vs BAN Test Series
Aaditya Thackeray : “कुठे गेलं तुमचं हिंदुत्व?”, भारत-बांगलादेश सामन्यावरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

२०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात बहुरंगी लढत झाली होती. तर, २०१९ मध्येही भाजपा, काँग्रेस आणि मनसे अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. राज्याच्या राजकारणात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता महायुतीकडून या मतदारसंघावर कोण दावा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण हे मंत्री असून गेल्या तीन टर्मपासून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येत आहेत. परंतु, डोंबिवलीतील रखडलेली अनेक कामे, वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांचा प्रश्न, एमआयडीसीला लागत असलेल्या आगी आदी प्रश्न अद्यापही सुटलेले नसल्याने तसंच, मंत्री असूनही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास न नेल्याने त्यांच्याविरोधातही वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तरी यंदा त्यांना महाविकास आघाडीला टफ फाईट द्यावी लागणार आहे.

हेही वाचा >> Nanagaon : नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण आणि भुजबळांशी वैर, यावेळी कांदे गड राखणार?

तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर कोणीही दावा केला तरी त्यांना भाजपाच्या पारंपरिक मतदारसंघातील निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे. भाजपाचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे स्पष्ट आहे. तसंच २०१९ मध्ये रवींद्र चव्हाण यांना मनसेचे श्रीकांत हळबे यांनी टफ फाईट दिली होती. श्रीकांत हळबे यांना ४१ हजार ३११ मते मिळाली होती. तर, रवींद्र चव्हाण यांना ८३ हजार ८७२ मते मिळाली होती. मनसेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगलेच वर्चस्व आहे. तसंच, कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील आहेत. त्यांचाही आजूबाजूच्या शहरात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे मनसेही या जागेवरून उमेदवार उभा करू शकतो. परिणामी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिहेरी लढत यंदाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघात किती मतदार?

हा मतदारसंघ खुला प्रवर्गातील असून येथे २०१९ च्या आकडेवारीनुसार एकूण मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार ३३० एवढी आहे. यामध्ये १ लाख ७४ हजार ५४४ पुरुष मतदार आणि १ लाख ६३ हजार ७३४ महिला मतदार आहेत. २०१९ मध्ये ४४.७२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा किती टक्के मतदान होतंय, कोणाला होतंय यावर इतर गणितं अवलंबून आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dombivali vidhansabha consistency will ravindra chavan win again or mva win sgk

First published on: 18-09-2024 at 17:04 IST

संबंधित बातम्या