नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर रोहित शर्माच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये रोहितची गणना केली जाते. मात्र, आगामी काळात तो क्रिकेटच्या विशिष्ट प्रारूपावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते. त्यातच निवड समितीने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी रोहितला विश्रांती दिली आहे. त्यामुळे रोहितचे संघातील भवितव्य काय आणि रोहितनंतर कर्णधारपदासाठी सक्षम पर्याय कोण आहेत, असे प्रश्न उपस्थित होतात.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली?

तारांकित फलंदाज विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे संघाची जबाबदारी आली. त्याने भारतीय संघाचा दर्जा आणखी उंचावला. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग दहा विजय नोंदवले. त्यामुळे कर्णधार म्हणून रोहितचे कौतुक झाले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ४५ एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाने ३४ विजय नोंदवले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ५१ पैकी ३९ सामने जिंकले असून १२ सामन्यांत संघ पराभूत झाला. तसेच रोहित कर्णधार असताना भारताने ९ पैकी पाच कसोटी सामन्यांत विजय नोंदवले, दोन सामन्यात संघ पराभूत झाला आणि दोन सामने अनिर्णित राहिले.

Foreign Minister S Jaishankar expressed confidence that he expects progress in relations with China
चीनबरोबरच्या संबंधांमध्ये प्रगतीची अपेक्षा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडून विश्वास व्यक्त
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
assembly elections 2024 Sc reservation Subclassification Grand Alliance Mahavikas Aghadi voting  print politics news
अनुसूचित जातीच्या मतांचे ध्रुवीकरण? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा फटका
New Zealand cricket team
Ind vs New: न्यूझीलंडने भारतात येऊन ‘करून दाखवलं’, ७ अचंबित करणारे विक्रम केले नावावर, जाणून घ्या
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Discrepancy in teaching hours in RTE and State Syllabus
आरटीई, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील अध्यापन तासांमध्ये विसंगती… झाले काय, होणार काय?
thane, navi mumbai, dombivali, kalyan gramin,
ठाणे-कल्याणच्या वेशीवर आगरी अस्मिता प्रभावी
upsc questions in exam
UPSC ची तयारी : UPSC मुख्य परीक्षा २०२४; प्रश्नांचे अवलोकन

फलंदाज म्हणून रोहितचे संघासाठी योगदान महत्त्वाचे का?

महेंद्रसिह धोनीने रोहितला सलामीला संधी दिली. २०१३च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत निर्णायक भूमिका पार पाडणाऱ्या रोहितने नंतर मागे वळून पाहिले नाही. आपल्या आक्रमक शैलीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दडपण आणण्यात तो पटाईत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. त्याने २६२ एकदिवसीय सामन्यांत १०,७०९ धावा केल्या असून सध्याच्या काळातील तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा… विश्लेषण: युक्रेन युद्ध पुतिन जिंकू लागले आहेत का? युक्रेनचा प्रतिहल्ला का फसला?

एकदिवसीय क्रिकेटमधील २६४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. रोहितने ट्वेन्टी-२० प्रारूपात १४८ सामने खेळले असून ३८५३ धावा केल्या आहेत. या प्रकारात त्याने चार शतके झळकावली. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ५२ सामन्यांत ३६७७ धावा केल्या आहेत. या प्रारूपात १० शतके त्याच्या नावे असून २१२ ही सर्वोत्तम खेळी आहे. रोहितने कर्णधार झाल्यापासून अधिक आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात याचा प्रत्यय आला. रोहित सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटपासून काही काळ दूर जाणार असल्याची चर्चा आहे.

सलामीसाठी सध्या कोणते सक्षम पर्याय उपलब्ध आहेत?

सध्या रोहित मर्यादित षटकांच्या सामन्यात शुभमन गिलसोबत सलामीला उतरतो. याशिवाय ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांसारखे खेळाडू सलामीला खेळण्यास सक्षम आहेत. गिलला भारतीय संघाचे भविष्य मानले जात आहे. गिलने वेळोवेळी ते आपल्या कामगिरीने सिद्धही केले आहे. गिल सर्वच प्रारूपांत भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरत आहे. त्याने आतापर्यंत ४४ एकदिवसीय सामन्यांत २२७१ धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-२०च्या ११ सामन्यांत त्याने ३०४ धावा केल्या आहेत. कसोटीतही त्याच्या नावे १८ सामन्यांत ९६६ धावा आहेत. इशान किशनही आक्रमक खेळ करण्यास सक्षम आहे. इशानने २७ एकदिवसीय सामन्यांत ९३३ व ट्वेन्टी-२० सामन्यांत ७९६ धावा केल्या आहेत. ऋतुराजने आतापर्यंत १७ ट्वेन्टी-२० सामन्यांत ४५८ आणि चार एकदिवसीय सामन्यांत १०६ धावा केल्या आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत त्याने आपली क्षमता सिद्ध केली. या सर्व सलामीवीरांमध्ये यशस्वी हा सर्वात युवा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या ११ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३१२ व दोन कसोटी सामन्यांत २६६ धावा केल्या आहेत.

रोहितनंतर कर्णधारपद सांभाळू शकतील असे खेळाडू कोण?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष्य आता पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेकडे आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत भारताचे कर्णधारपद कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष राहील. दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरता रोहित केवळ कसोटी कर्णधारपद भूषविणार आहे. निवड समितीने एकदिवसीय व ट्वेन्टी-२० संघाची धुरा अनुक्रमे केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांच्यावर सोपवली आहे. तसेच हार्दिक पंड्या गेल्या काही काळापासून ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र, तो सध्या जायबंदी आहे आणि त्यामुळेच सूर्यकुमारला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलशिवाय श्रेयस अय्यर कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकतो. तसेच काही सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने संघाचे कर्णधारपद भूषवले होते. आफ्रिका दौऱ्यासाठी ट्वेन्टी-२० संघाचे उपकर्णधारपद रवींद्र जडेजा सांभाळणार आहे. त्यामुळे आगामी काळात निवड समिती या सर्व पर्यायांचा विचार करू शकते.