हर्षद कशाळकर
‘शासनाचे काम आणि दहा वर्षे थांब’ अशी एक म्हण प्रचलित आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग याचे उत्तम उदाहरण आहे. २०१० साली मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर कामाला सुरुवात झाली होती. पण २०२३ सरायला आले तरी महामार्गाचे काम मार्गी लागलेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करत असले तरी कामाची गती लक्षात घेता यंदाही चाकरमान्यांचा कोकण प्रवास खडतर राहणाची शक्यता अधिक आहे. महामार्गाच्या सद्यःस्थितीचा हा थोडक्यात आढावा..
महामार्गाचे काम कसे होणार?
मुंबईतून तळकोकणात जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्ग ओळखला जातो. कोकणातील व्यापारी बंदरे, औद्योगिक वसाहती आणि पर्यटनाच्या दृष्टीने या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उताराचे घाट, महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारे अपघात या कारणामुळे या ४५० किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील महामार्गाचे काम २०११ मध्ये, तर इंदापूर ते झाराप यादरम्यानचे काम २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला पळस्पे ते इंदापूर हे काम डांबरीकरणाच्या माध्यमातून तर इंदापूर ते झाराप हे काम काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून होणार होते. नंतर मात्र संपूर्ण महामार्गाचे काम काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा… जी-२० शिखर परिषद : कोणत्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे?
महामार्गाच्या कामाचे टप्पे कसे आहेत?
पळस्पे ते इंदापूर कामाचा अनुभव लक्षात घेऊन महामार्गाचे काम लहान–लहान टप्प्यांंत करण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यात पळस्पे ते कासू, कासू ते इंदापूर, इंदापूर ते वडपाले, वडपाले ते भोगाव, भोगाव ते कशेडी, कशेडी ते परशुराम घाट, परशुराम घाट ते आरवली, आरवली ते कांटे, कांटे ते वाकेड, वाकेड ते तलगाव, तलगाव ते कालगट आणि कालगट ते झाराप असे एकूण बारा टप्पे करण्यात आले आहेत. वेगवेगळे ठेकेदार नेमून आता हे काम पूर्ण केले जाणार आहे.
हेही वाचा… रोहित, विराटला शाहीन आफ्रिदी वारंवार कसा गारद करतो? त्याचा स्विंग खेळणे अवघड आहे का?
महामार्गाच्या कामाची सद्यःःस्थिती काय?
महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर हे काम हे २०१४पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तर इंदापूर ते झाराप हे काम २०१८ अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२३ चा सप्टेंबर महिना उजाडला तरी महामार्गाच्या दोन्ही टप्प्यांतील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहित. पळस्पे ते कासू दरम्यानच्या गोव्याकडील एका मार्गििकेच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कासू ते इंदापूर मार्गिकेच्या कामाला अजूनही गती मिळालेली नाही. महामार्गावरील सर्वात खराब रस्ता याच टप्प्यात आहे. इंदापूर ते वडपाले २५ किलोमीटरपैकी १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. वडपाले ते भोगाव आणि भोगाव ते कशेडी मार्गातील एका मार्गिकेचे काम झाले आहे. कशेडी ते परशुराम घाट टप्प्यातील परशुराम घाटातील काम शिल्लक आहे. आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड टप्प्यातील काम रखडलेले आहे. तर वाकेड ते झाराप दरम्यानचे कामे पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बारा टप्प्यांपैकी रायगड जिल्ह्यातील दोन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन कामे अद्यापही मार्गी लागू शकलेली नाहित. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश काम पूर्ण झाली आहेत.
हेही वाचा… मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन?
महामार्गाचे काम का रखडले?
सुरुवातीला महामार्गाच्या भूसंपादनात अडचणी आल्या. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादन प्रक्रिया लांबली. नंतर भूसंपादनाचा मोबदला देण्यास उशीर झाल्याने जागेचा ताबा मिळण्यास विलंब झाला. कर्नाळा अभयारण्यातून हा महामार्ग झात असल्याने पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यात अडचणी आल्या. नंतर ठेकेदाराची दिवाळखोरी आडवी आली. म्हणून हे काम वििहित मुदतीत पूर्ण करता यावे यासाठी ५४० कोटींचा निधी ‘‘वन टाईम इन्फ्युजन स्कीम’’ अंतर्गत उपलब्ध करून दिला. पण त्यानंतरही ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने त्याला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बडतर्फीनंतर ठेकेदाराने हे प्रकरण न्यायालयात नेले. न्यायालयीन प्रिक्रियेत दोन वर्षांचा कालावधी गेला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये ठेकेदाराचा दावा अमान्य केला. यानंतर नवीन ठेकेदार नेमून ही कामे पुन्हा सुरूू करण्यात आली.
हेही वाचा… महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद पुन्हा का वाढतो आहे?
कामे कधी पूर्ण होणार?
राज्य सरकारच्या वतीने कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी पळस्पे ते झाराप टप्प्यातील एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल. तर डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दर महिन्याला तीन ते चार वेळा महामार्गाच्या कामाची पाहणी करून पाठपुरावाही करत आहेत. पावसातही काम करता यावे यासाठी कासू ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात `सिमेंटबेस ट्रीीटमेंटʼ पद्धद्धतीचा वापर केला जात आहे. यासाठी विशेष यंत्रसामग्री आणण्यात आली आहे. पण सध्याची कामाची गती, एकूण परिस्थिती आणि पुलांची रखडलेली कामे लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एक मार्गिकेचे काम पूर्ण होणे कठीण आहे.
लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि ठेकेदारांशी हितसंबध हा अडसर?
देशातील सर्वाधिक रखडलेला प्रकल्प म्हणून या महामार्गाच्या कामाकडे पाहिले जाऊ शकते. महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडलेले असताना स्थानिक लोकप्रतिनिधी उदाीसीन असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारांशी असलेले िहितसंबंध यास कारणीभूत असल्याची चर्चा सुूरू आहे. गेल्या १३ वर्षांंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपवाद सोडला तर एकाही राजकीय पक्षाने यासाठी साधे आंदोलनही केले नाही. शिवसेना, भाजप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. पळस्पे ते कासू या महामार्गाचे काम शेकापचे नेते जे.. एम.. म्हात्रे यांच्या कंपनीकडे आहे. म्हात्रे यांचे सर्वच पक्षियांशी उत्तम संबंध असल्यामुळे बहुधा आंदोलने होत नसावीत, अशी चर्चा आहे.