दयानंद लिपारे

दक्षिण काशीतील पवित्र स्थळातील खोलवर कुंड बुजवले गेले. मंदिर सुधारणेच्या नावाखाली त्यावर स्वच्छतागृह बांधण्यात आले. हे पवित्र कुंड पूर्ववत उघड करावे, यासाठी भाविकांनी लढा दिला. अखेर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

Hanuman Temple Name in Pune Hanuman Jayanti 2024
‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा विषय दीर्घकाळ वादात होता. आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कुंड खुला करण्याचा निर्णय घेऊन पुरातत्त्व विभागाच्या अनुमतीने प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला असून उत्खनन चार महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर सुशोभीकरण केले जाणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  ‘मनकर्णिका कुंड’ याला पुरातन काळातील संदर्भ आहेत. कुंडामध्ये महिला आत्महत्या करतात या कारणाने १९६० साली ते बुजवण्यात आल्याने प्राचीन ठेवा मातीआड लपला गेला.

भाविकांचा लढा

राज्य शासनाने श्री महालक्ष्मी मंदिर हे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून १९९७ साली घोषित केले आहे. यामुळे देवस्थान समितीला मंदिराच्या वास्तूमध्ये कोणतेच बदल करण्याचा अधिकार नसताना मंदिराच्या मूळ स्वरूपास बाधा येईल असे अनेक बदल  केले गेले. कोणत्याही कार्यवाहीस पुरातत्त्व खात्याकडून परवानगीही मागण्यात आलेली नव्हती.देवळाच्या आवारात मनकर्णिका कुंड असलेल्या जागी सुलभ शौचालय बांधण्याची कृती पुरातत्त्वीय आणि धार्मिक संकेतांचाही भंग करणारी ठरल्याने सन २००३ मध्ये प्रमोद सावंत यांसह एकूण १० जणांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. त्यावर तब्बल १० वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी त्यावर निकाल दिला. ‘मंदिराचे उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ मनकर्णिका तीर्थ बंद करून सुलभ शौचालय करण्याचा बदलही अनधिकृतरीत्या मूळ ढाच्याला बाधा आणणारे आहे. तसेच ते मंदिराच्या सौंदर्यात विद्रूपीकरण करण्यासारखे असल्यामुळे काढून टाकण्यात यावेत,’ असे त्या आदेशात म्हटले होते; परंतु त्या आदेशाचे पालन झालेच नाही. यावर कुंडावरील शौचालय हटवून ते भाविकांसाठी खुले न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटना व हिंदु जनजागृती समितीने दिला. कुंडावर बांधलेले सार्वजनिक शौचालय जून २०१६ मध्ये शिवसैनिकांनी कुदळ, फावडे यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्यावर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांनीही याबाबत विधानसभेत आवाज उठविला होता. मनकर्णिका कुंड असणारी जागा महापालिकेने देवस्थानकडून घेतली होती. या जागेवर उद्यान करण्यात आले. नंतर हे हटवून तिथे शौचालय उभारण्यात आले. हा कराराचा भंग असल्याने महापालिकेकडून ही जागा काढून घेण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील राहिली. पालिका प्रशासनाकडून मणकर्णिका कुंड जागेचा ताबा देवस्थान व्यवस्थापन समितीकडे जानेवारीत हस्तांतरित केला. ‘हे आमच्या पाठपुराव्याचे यश असून मनकर्णिका कुंड पुनरुज्जीवनाचे काम सुरू झाले आहे,’ असे हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे म्हणणे आहे.

कुतूहल वाढीस

देवस्थान समितीने मणकर्णिका कुंड खुला करण्यासाठी शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, साहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्याकडील प्रतिनिधी उत्तम कांबळे, अमरजा निंबाळकर, गणेश नेर्लेकर, उमाकांत राणींगा, प्रसन्न मालेकर या सात सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने बाजूने पत्रे लावून परिसर बंदिस्त करून सीसीटीव्हीच्या देखरेखीत होणार आहे, असे समितीचे सचिव विजय पोवार यांनी सांगितले. तथापि, खोदाई पूर्ण झाल्यानंतर कुंड मूळ स्वरूपात कितपत येणार याकडे आता भाविकांचे लक्ष लागले आहे. पूर्वी या कुंडामध्ये सुमारे अठरा झरे होते. त्याचे उमाळे आता इतक्या वर्षांनंतर कसे असणार हेही लक्षवेधी ठरले आहे.