News Flash

शिवसेनेतील गटबाजीला कोल्हापुरात पुन्हा उत

कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

जिल्हा परिषद , नगरपालिका, महापालिका या पाठोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये झालेले कुरघोड्यांचे राजकारण, खच्चीकरणाचा प्रयत्न, जिल्हा प्रमुखांना सन्मान न देणे यासारख्या घटनांमुळे शिवसेनेतील गटबाजीने पुन्हा उचल खाल्ली आहे. पक्ष कार्य, निवडणुका यासाठी पक्षाचे पदाधिकारी हवेत आणि नेत्यांच्या दौऱ्यावेळी सापत्नभावनेने वागणूक द्यायची यावरून असंतोषाला तोंड फुटले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व शेकाप यांचा गड असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेने गेल्या तीन दशकात चांगलेच पाय रोवले . पण, पक्ष विस्तारेल तसतसे गटबाजीचे लोणही  वाढत चालले . शिवसेनेतील गटबाजी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील नेहमीचाच चच्रेचा विषय बनलेली असते. पदाधिकारी जितके तितकीच गटबाजी असे स्वरूप प्राप्त झाले आहे.  संधी आली की  एकमेकांचे उट्टे काढले जातात .  पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्हा  दौऱ्यावर आल्यावर गटबाजी हमखास पाहावयास मिळते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आगामी  दौराही त्याला  अपवाद ठरण्याची चिन्हे नाहीत . यावेळी कारण पुरणार आहे ते निवडणुकीचे .

कोल्हापूर जिल्हय़ातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. संपर्क नेते दिवाकर रावते हे आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठबळ देतात आणि आपले जाणीवपूर्वक खच्चीकरण करतात, असा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडून होत होता. याच मुद्यावरून लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या बठकीत वादाला तोंड फुटले होते .

पंधरवड्यापूर्वी दोन जिल्हाप्रमुखांशी  पक्षांतर्गत संघर्ष करून सलग  दोन वेळा निवडून येणाऱ्या आमदार  राजेश क्षीरसागर यांच्या पक्षांतर्गत वर्चस्वाला कोल्हापूर दक्षिणचे शहरप्रमुख दुग्रेश िलग्रस यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत काँग्रेसला हात देत धक्का दिला . यातून शिवसेनेत पुन्हा गटबाजी उफाळली . तर , नगरपालिका निवडणुकीत आमदार उल्हास पाटील यांनी शिरोळ तालुक्यात ‘ धनुष्यबाण ‘ चिन्ह गोठवण्यावरून सेनेतील वादाला फोडणी मिळाली . तर , जिल्हा परिषद निवडणुकीत पक्ष चिन्हाचा आग्रह  कायम असताना सुजित मिणचेकर , प्रकाश आबिटकर व उल्हास पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रमुखांमध्ये तीव्र नाराजी आहे .

या निवडणुकीत शिवसेनेला माफक यश मिळाले . सर्वाधिक ६ आमदार असतानाही सेनेला कसेबसे दशक गाठता आले . विधानसभा जिंकता येते मग जिल्हा परिषदेत घोडे का पेंड खाते , असा खडा सवाल शिवसनिक उपस्थित करत आहेत . निकालानंतर झालेल्या बठकीला जिल्हा प्रमुखांना प्रथम पाचारण केले नव्हते . केवळ आमदार चच्रेत सहभागी झाले . यावर तिन्ही जिल्हा प्रमुखांनी ’ प्रचार करून उमेदवार निवडून आणायला आम्ही , चच्रेला भलतेच कसे ’ , अशी विचारणा केल्यावर त्यांच्यासाठी वेगळ्या बठकीचे आयोजन केले . त्यांच्यावर अहवाल बनवण्याची जबाबदारी देण्याचे नाट्य रंगवले गेले . यातून पुन्हा एकदा शिवसेनेतील गटबाजीला उधाण आले आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:30 am

Web Title: internal dispute in shiv sena
Next Stories
1 मी राष्ट्रवादीचाच खासदार – धनंजय महाडिक
2 ‘स्वाभिमानी’ फुटीच्या उंबरठय़ावर
3 मुश्रीफ, महाडिक यांच्यातील संघर्षांला पुन्हा तोंड फुटले
Just Now!
X