कोल्हापूर : शिवजन्मभूमी शिवनेरी गडावरील शिवाई देवीच्या मंदिरात ठेवलेल्या छत्रपती शिवरायांच्या पादुकांचे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीने बुधवारी स्वागत करून पादुकांवर मंत्रघोषात अभिषेक करण्यात आला.

सन १९९५ पासून दरवर्षी या पादुका पालखी मिरवणुकीने पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेत सहभागी होण्यासाठी शिवभक्त घेऊन येतात. यावर्षी प्रथमच या पादुका वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मोहिमेचे समन्वयक डॉ. संदीप महिंद, सहकारी पादुका घेऊन मंदिरात आले. त्याचे श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्र्वर, सहसचिव अजित ठाणेकर, केदार मुनिश्र्वर, ऐश्वर्या मुनिश्र्वर, अनिकेत अष्टेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर पादुका व सोबत असलेली तलवार गर्भगृहात नेवून त्यांना श्री करवीर निवासिनी मूर्तीचा चरण स्पर्श करून पूजन करण्यात आले. आठवडेकरी श्री पूजक श्री मुनिश्र्वर, धनश्री मुनिश्र्वर यांच्याकडून पादुकांना मानाचा शेला अर्पण केला.

हेही वाचा – पंचगंगा ‘धोका समीप’ ; कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका वाढला

हेही वाचा – पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; रस्ते बंद, एसटी सेवेवर परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, सुरक्षा पर्यवेक्षक संदीप साळोखे यांच्यासह कर्मचारी आणि भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.