कोल्हापूर : आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गुरुवारी सहपत्नीक करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते कोल्हापुरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी पत्नी भुवनेश्वरी यांच्या समवेत अर्धा तास करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची पूजा केली. त्यांचा दौरा लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर काही मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली होती.

हेही वाचा – उद्योगासह दरडोई उत्पन्नवाढ मंदावली

हेही वाचा – आईच्या उत्तरकार्याला १५० हापूस आम्र रोपांचे वाटप; पुत्राचा पर्यावरण रक्षणाचा संदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दर्शनानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकारांशी अल्पकाळ संवाद साधला. ते म्हणाले, देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. एकूण प्रवाह पाहता एनडीएसाठी चांगले वातावरण आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली ४०० हून अधिक जागांवर यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंध्र प्रदेशच्या राजकारणावर मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. यानंतर नायडू हे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला रवाना झाले.