कोल्हापूर: वादग्रस्त विधान करायचे आणि पुन्हा माफी मागायची. यातून वातावरण गढूळ करायचे हि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शैली बनत चालली आहे. चंद्रकांतदादांवरील शाईफेकीचा प्रकार दुर्दैवी आहे. पण चंद्रकांतदादांनी माफी मागण्याची ही सातवी ते आठवी फेरी असेल, असा खोचक टोला माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे लगावला.

हेही वाचा >>> धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी न्यायालयात झाली तर शिवसेनेला…; अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा उफाळला. यावर शरद पवार यांनी ४८ तासांमध्ये हा प्रश्न मिटला नाही तर आपण बेळगावत जाऊ असा इशारा दिला होता. त्याची दखल घेतल्याने कर्नाटकातील वातावरण शांत झाले आहे, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

हेही वाचा >>> बारा तास चौकशीनंतर ईडी पथक परतले; मुश्रीफांच्या घराबाहेर समर्थकांचा मेळावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांच्या पत्रामुळे पुन्हा गोंधळ

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्राविषयी मुश्रीफ म्हणाले, राज्यपालांनी दिलेल्या पत्रामुळे पुन्हा गोंधळ होणार आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यास सहानुभूती दाखवली जाणार असेल तर राज्यातील जनता माफ करणार नाही. त्यांना पदावरून हटवले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.