वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल याने काही दिवसांपूर्वी सहकारी रामनरेश सरवान याच्यावर ‘करोनापेक्षा भयंकर आणि घातक’ असल्याची टीका केली होती. कॅरेबियन प्रिमीयर लीग (CPL) स्पर्धेत गेलला जमैका तल्हायवाज संघातून सोडचिठ्ठी देण्यात आली. त्यात सरवानचा हात असल्याचा आरोप गेलने आपल्या यू ट्युब चॅनेलवरून व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. मात्र माजी क्रिकेटपटू रामनरेश सरवानने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत गेललाच त्याच्या भूतकाळाची आठवण करून दिली होती. या प्रकरणी ख्रिस गेलवर कारवाई होऊ शकते असे संकेत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी दिले होते. त्यानंतर ख्रिस गेल वठणीवर आला आणि त्याने माफी मागत स्पर्धेत जबाबदारीने वागण्याचे व्यवस्थापनाला वचन दिले. त्यामुळे आता त्याला शिस्तपालन चौकशीला सामोरे जाण्याची गरज नाही.

ते तीन शब्द अन्… द्रविड-लक्ष्मणने खेळून काढला अख्खा दिवस

ख्रिस गेलने या प्रकाराबाबत स्पष्टीकरण दिले असून CPL ने त्याचा खुलासा आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. “मी काही दिवसांपूर्वी माझ्या वैयक्तिक यू ट्युब चॅनेलवरून तीन व्हिडीओ पोस्ट केले होते. त्या व्हिडीओमध्ये CPL मधील जमैका तल्हायवाज संघातून मला का वगळण्यात आलं याबद्दल काही कारणं सांगितली. त्या व्हिडीओ पोस्ट करण्यामागे माझा एकमेव उद्देश होता की माझ्या जमैकाच्या चाहत्यांना मला स्पष्टीकरण द्यायचं होतं. माझी अशी इच्छा होती की ज्या संघाला मी दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले, त्या जमैका संघाकडून मला माझा CPL कारकिर्दीचा शेवटचा सामना घरच्या प्रेक्षकांसमोर सबिना पार्क मैदानावर खेळायला मिळावा”, असे गेलने पत्रकात म्हटले आहे.

विराटचा एक रिप्लाय अन् वादच संपला…

मी माझ्या चाहत्यांना उत्तर दिलं आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी जे काही बोललो ते मनापासून बोललो. CPL टी २० लीग स्पर्धेला किंवा व्यवस्थापनाला बदनाम करण्याचा माझा मुळीच उद्देश नव्हता. ज्या स्पर्धेने गेली सात वर्षे कॅरेबियन बेटांवरील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली, त्या स्पर्धेबाबत मलाही आदर आहे”, अशा शब्दात गेलने पत्रकाद्वारे माफी मागितली आणि स्पर्धेबाबत जबाबदारीने बोलण्याचे वचन दिले. त्याच्या या वचनामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे CPL व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.