भारताच्या पुरुष आणि महिला बॅडमिंटन संघासाठी थॉमस आणि उबेर चषकात तुलनेने सोपे वेळापत्रक आहे. डेन्मार्क येथे ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे.

भारताच्या पुरुष संघाला ‘क’ गटात स्थान मिळाले आहे. त्यांच्या गटात डेन्मार्क, जर्मनी आणि अल्जेरिया यांचा समावेश आहे. भारताच्या महिला संघाचा ‘क’ गटात चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यासोबत समावेश आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाला स्पर्धेत पाचवे मानांकन देण्यात आले आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १६ ते २४ मेदरम्यान होणार होती. मात्र करोनामुळे ती लांबणीवर टाकून १५ ते २३ ऑगस्टदरम्यान ठरवण्यात आली होती. मात्र करोनाचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा ही स्पर्धा ऑक्टोबपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.

थॉमस चषक (पुरुष)

गट ‘अ’ : इंडोनेशिया, मलेशिया, हॉलंड, इंग्लंड; गट ‘ब’ : चीन, तैवान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स; गट ‘क’ : भारत, डेन्मार्क, जर्मनी, अल्जेरिया; गट ‘ड’ : जपान, दक्षिण कोरिया, थायलंड, कॅनडा

उबेर चषक (महिला)

गट ‘अ’ : जपान, तैवान, इजिप्त, स्पेन ; गट ‘ब’ : कोरिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया; गट ‘क’ : थायलंड, डेन्मार्क, स्कॉटलंड, कॅनडा; गट ‘ड’ : भारत, चीन, फ्रान्स, जर्मनी