03 June 2020

News Flash

हेर्थाचा युनियन बर्लिनवर दणदणीत विजय

या विजयामुळे हेर्थाने बुंडेसलीगा फुटबॉलच्या गुणतालिकेत १०व्या स्थानी झेप घेतली आहे.

संग्रहित छायाचित्र

 

यजमान हेर्था संघाने ७४ हजार प्रेक्षक क्षमतेच्या रिकाम्या स्टेडियममध्ये आपल्या कामगिरीचा सर्वोत्तम नजराणा पेश करत युनियन बर्लिनवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे हेर्थाने बुंडेसलीगा फुटबॉलच्या गुणतालिकेत १०व्या स्थानी झेप घेतली आहे.

दुसऱ्या सत्रात वेदाद इबिसेव्हिक, दोडी लुकेबाकियो, मथेअस कुन्हा आणि डेरिक बोयाटा यांनी गोल करत हेर्थाला मोठा विजय मिळवून दिला. ‘‘प्रेक्षकांच्या साक्षीने आम्ही ही कामगिरी साकारली असती तर अधिक आनंद झाला असता. मात्र आमच्या चाहत्यांना आनंद देऊ शकलो, याचेच समाधान अधिक वाटत आहे,’’ असे हेर्थाचे प्रशिक्षक ब्रुनो लब्बाडिया यांनी विजयानंतर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 2:03 am

Web Title: hertha defeats union berlin abn 97
Next Stories
1 ‘पंच’नामा!
2 डाव मांडियेला : डबलची भीती
3 फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी, La Liga स्पर्धेला स्पेन सरकारची मंजुरी
Just Now!
X