04 March 2021

News Flash

IPL 2019 : ‘सर जाडेजा’ चमकले, शंभराव्या बळीची नोंद

स्टिव्ह स्मिथचा घेतला बळी

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची कमाल दाखवली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानाता राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध खेळत असताना, जाडेजाने आयपीएलमध्ये आपल्या शंभराव्या बळीची नोंद केली आहे. स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत जाडेजाने आपल्या खात्यात शंभराव्या बळीची नोंद केली. यावेळी आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत जाडेजाने आपलं पहिलं स्थान अबाधित राखलं आहे.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा महेंद्रसिंह धोनीचा निर्णय, त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडल्यानंतर, रविंद्र जाडेजाने राहुल त्रिपाठीला माघारी धाडलं. यानंतर मधल्या फळीतल्या स्टिव्ह स्मिथलाही जाडेजाने आपलं शिकार बनवलं. अंबाती रायुडूने त्याचा झेल पकडला. स्टिव्ह स्मिथने 15 धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 9:15 pm

Web Title: ipl 2019 rr vs csk ravindra jadeja completes 100th wicket in ipl
Next Stories
1 राजस्थानच्या पराभवाची मालिका सुरुच, चेन्नईची सामन्यात बाजी
2 IPL 2019 : रात्री उशीरापर्यंत चालणारे सामने त्रासदायक – कुलदीप यादव
3 IPL 2019 : पंजाबविरुद्ध लढतीत पोलार्डचा दाणपट्टा, भीमपराक्रमाची नोंद
Just Now!
X