03 December 2020

News Flash

IPL 2020: धोनीची पुन्हा झाली करोना चाचणी; वाचा काय आला रिपोर्ट

३ सप्टेंबरला CSKच्या संपूर्ण संघाची पुन्हा होणार चाचणी

IPL 2020 स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक असून आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण गेला आठवडा हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूपच वेदनादायी गेला. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले. संघाला आणखी एका आठवड्याच्या क्वारंटाइनला सामोरं जावं लागलं. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन क्रिकेटपटूंसह आणखी १२ सहाय्यक कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सोमवारी कर्णधार धोनीसह संपूर्ण संघाची, सहाय्यक सदस्यांची पुन्हा नव्याने चाचणी करण्यात आली.

CSKच्या करोनाग्रस्त क्रिकेटपटूला खास संदेश

तब्बल १४ जण करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर साऱ्यांचे पुढील चाचणीकडे लक्ष होते. पण टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, CSKच्या शिबिरासाठी आणि चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व सदस्यांची व खेळाडूंची सोमवारी करोना चाचणी घेण्यात आली. त्यात सर्व खेळाडू व सहाय्यक कर्मचारी करोना निगेटिव्ह आढळले. आता आणखी एक करोना चाचणी ३ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून प्रशिक्षण शिबिरांना सुरूवात केली जाणार आहे. पण दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांना मात्र प्रशिक्षण शिबिरात दाखल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण शिबिरात येण्यास त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी

 

दरम्यान, भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने अद्याप युएईला जाण्यासाठी उड्डाण केलेले नाही. काही सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हरभजनदेखील स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर फाफ डू प्लेसिस आणि लुंगी एन्गीडी हे दोन परदेशी क्रिकेटपटू मंगळवारी अबू धाबी येथे दाखल झाले असून क्वारंटाइन झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 5:11 pm

Web Title: ipl 2020 ms dhoni and csk players support staff test negative for covid 19 to undergo one more test vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: CSKला दिलासा! दोन तगडे क्रिकेटर युएईत दाखल
2 IPL 2020 : सलामीच्या सामन्यातून CSK बाद?? मुंबईला विराटच्या RCB चं आव्हान मिळण्याचे संकेत
3 IPL 2020 : CSK संघात नाराजीनाट्य?? केदारचा नाव न घेता रैनाला टोला
Just Now!
X