News Flash

अरेरे! पराभवाबरोबरच जो रूटच्या नावावर झाला नकोसा विक्रम

जो रूटचे पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात भोपळा

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने रविवारी लौकिकाला साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेचा अ‍ॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखण्यात यश मिळवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

इंग्लंडच्या संघाने सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना सामना वाचवता आला नाही. या पराभवासोबतच इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवण्यात आला. एका कसोटी मालिकेत तीन वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याला शून्यावर माघारी परतावे लागले. तसेच चौथ्या सामन्यातही तो दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १९७ धावांत आटोपला. शनिवारच्या २ बाद १८ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जो डेन्ली यांनी सावध सुरुवात केली. दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६६ धावांची भागीदारी रचली; परंतु कमिन्सचे दुसऱ्या स्पेलमध्ये आगमन होताच इंग्लंडचा डाव कोसळला.

कमिन्सने सलग दुसऱ्या डावात रॉयचा बॅट आणि पॅडमधून (३१) त्रिफळा उडवला, तर पाच षटकांच्या अंतरातच त्याने धोकादायक बेन स्टोक्सला अवघ्या एका धावेवर बाद करून इंग्लंडला अडचणीत टाकले. डेन्लीने अर्धशतक झळकावून इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु नॅथन लायनने त्याला ५३ धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाचा मार्ग अधिक सोपा केला. ५ बाद ९३ धावांवरून जॉनी बेअरस्टो आणि जोस बटलर यांनी सहाव्या गडय़ासाठी महत्त्वपूर्ण ४५ धावा जोडल्या. मात्र मिचेल स्टार्कने बेअरस्टोला (२५) पायचीत पकडून इंग्लंडला सहावा धक्का दिला.

अखेरच्या सत्रात इंग्लंडला ३६ षटके फलंदाजी करणे आवश्यक होते. जोस बटलर आणि क्रेग ओव्हरटर्न यांनी सातव्या गडय़ासाठी महत्त्वपूर्ण ३४ धावांची भर घालतानाच १० षटके खेळून काढल्यामुळे यजमान सामना वाचवण्यात अपयशी ठरणार, असे वाटू लागले. परंतु जोश हॅझलवूडने बटलरचा ३४ धावांवर त्रिफळा उडवला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली. अखेरीस हॅझलवूडने ओव्हर्टनला पायचीत पकडले आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्व संघाने एकच जल्लोष केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 10:21 am

Web Title: joe root 3 ducks 1 test series unwanted record ashes 2019 england australia vjb 91
Next Stories
1 Ashes 2019 : तब्बल १८ वर्षांनी जुळून आला ‘हा’ योगायोग
2 US Open : पाच तासांच्या झुंजीनंतर नदालला १९वे ‘ग्रँडस्लॅम’
3 युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष
Just Now!
X