News Flash

IPL 2021: विराट कोहलीच्या RCB ला मोठा धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार

वैयक्तिक कारणांमुळे माघार घेत असल्याचं सांगितलं कारण

(फोटो सौजन्य - बीसीसीआय )

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मोठा धक्का बसलाय. आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप आयपीएलमधून बाहेर झाला आहे. रॉयल चॅलेंजर्सने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.

ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला याला संघात स्थान दिलंय.

जोश फिलीपीने आयपीएलच्या 13 व्या हंगामात आरसीबीकडून पदार्पण केलं होतं. सलामीला येत त्याने 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. पण यंदाच्या आयपीएलमधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आयपीएल लिलावात 21 वर्षीय फिनवर कोणीही बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती. मात्र आता जोश फिलिपने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याने फिनला आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. फिनने अद्याप न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलेलं नाही, पण अलिकडेच संपलेल्या न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत त्याने शानदार फॉर्म दाखवला आणि 11 सामन्यात 56.88 च्या सरासरीने व 193 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा ठोकल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2021 11:34 am

Web Title: josh philippe makes himself unavailable for ipl 2021 finn allen to replace him at rcb squad sas 89
टॅग : IPL 2021,Rcb
Next Stories
1 IPL 2021 ची तारीख ठरली! आता फक्त GC च्या परवानगीची प्रतिक्षा!
2 IPL 2021: RCB कडून खेळण्याआधी मॅक्सवेलचं विराट कोहलीसंबंधी मोठं विधान; म्हणाला…
3 IPL Auction 2021: “मला नाही वाटत २ कोटी २० लाख रुपयांसाठी स्टीव्ह स्मिथ त्याच्या पत्नीपासून…”
Just Now!
X