News Flash

Video : विजय शंकरचा हा अफलातून झेल पाहिलात का??

ख्वाजाला बाद करताना शंकरची तारेवर कसरत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पाहुण्या संघाला 236 धावांवर रोखलं. उस्मान ख्वाजा आणि मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कर्णधार आणि सलामीवीर फिंच भोपळाही न फोडता माघारी परतल्यानंतर ख्वाजा आणि स्टॉयनिसने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ख्वाजाने अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन देण्यात मदत केली. ख्वाजा खेळपट्टीवर टिकणार असं वाटत असतानाच, मोठा फटका खेळण्याच्या नादात कुलदीप यादवने त्याला झेलबाद केलं. उंच फटका खेळायला गेलेल्या ख्वाजाचा झेल विजय शंकरने सीमारेषेवर पकडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

विजय शंकरच्या या प्रयत्नांचं समालोचकांसह सोशल मीडियावर नेटीझन्सकडूनही कौतुक करण्यात येतय. माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी ख्वाजाची विकेट ही कुलदीप यादवपेक्षा विजय शंकरच्या खात्यात जायला हवी असं वक्तव्य केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 5:52 pm

Web Title: vijay shankar takes a blinder to get rid off usman khawaja watch video
टॅग : Ind Vs Aus
Next Stories
1 ये भाई लोग जैसा कोई हार्ड नही है, पृथ्वी शॉ कडून विराट-धोनीचं कौतुक
2 अभिनंदन यांच्या घरवापसीवर सचिनचा खास संदेश
3 विश्वचषकात धोनीचं संघात असणं विराटसाठी फायद्याचं – सुनील गावसकर
Just Now!
X