03 March 2021

News Flash

IPL 2019 : कर्णधारालाच शेरेबाजी? कोहली-बुमराहमध्ये आयपीएलआधीच जुंपली

दोघांमध्ये कोणता खेळाडू मारणार बाजी?

आयपीएलचा बारावा हंगाम सुरु होण्याआधीच टीम इंडियातल्या प्रमुख खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपलेली दिसत आहे. टीम इंडियाचे सहकारी असलेले हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये विविध संघाकडून खेळत असतात. Star Sports वाहिनीने यंदाच्या हंगामात प्रत्येक संघातील महत्वाच्या खेळाडूंना सोबत घेऊन एक जाहीरातीचं कँपेन केलं. यामध्ये मुंबई इंडियन्सचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला आव्हान दिलं आहे. “मी अजून जगातला सर्वोत्तम गोलंदाज नाहीये, अजुन मला सर्वोत्तम फलंदाजाच्या यष्ट्या उडवायच्या आहेत. विराट भाऊ आतातर आपण दोघं एका संघातही नाहीयोत.”

बुमराहच्या या आव्हानाला कोहलीनेही तितकच धडाकेबाज प्रत्युत्तर दिलं आहे.

आयपीएलच्या बाराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी रंगणार आहे. यानंतर बंगळुरु आणि मुंबईचे संघ जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा बुमराह कोहलीच्या यष्ट्या उडवण्यात यशस्वी ठरतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 5:24 pm

Web Title: watch virat kohli comes up with a befitting reply to bumrahs warning ahead of ipl 2019
Next Stories
1 IPL 2019 : मैदानात ये, खेळ दाखव आणि नाव कमव ! पंतच्या आव्हानाला धोनीचं प्रत्युत्तर
2 कोहलीचा विजयरथ घरच्या मैदानातच अडखळला
3 Video : ४६ षटकार, ८०७ धावा! इंग्लंड-विंडीजच्या फलंदाजांची ही आतषबाजी एकदा पाहाच
Just Now!
X