“पृथ्वी शॉसारखा फलंदाज संपूर्ण भारतात सापडणार नाही”

पृथ्वीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत २४ चेंडूत ४३ धावा केल्या.

aakash chopra praises prithvi shaw after his quick knock against sri lanka

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार पृथ्वी ज्याप्रकारे फलंदाजी करतो, भारताचा दुसरा फलंदाज तशी फलंदाजी करू शकत नाही. रविवारी झालेल्या पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेला ७ गड्यांनी नमवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

पृथ्वी शॉने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात शानदार खेळी केली. तो टी -२० सामना खेळत असल्यासारखा दिसत होता. वादळी शैलीत खेळत त्याने २४ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. या खेळीमुळे भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती. या सामन्यासाठी पृथ्वीला सामनावीर पुरस्कार मिळाला.

काय म्हणाला आकाश?

आकाशने आपल्या यूट्यूब वाहिनीवर पृथ्वी शॉच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “पहिला डाव संपल्यानंतर असे वाटले की लय श्रीलंकेबरोबर आहे, पण पृथ्वी शॉ आडवा आला. तो वेगळ्या स्तराचा खेळाडू दिसत होता. मी पृथ्वी शॉचा मोठा चाहता आहे कारण त्याच्यासारखा फलंदाज पूर्ण भारतात सापडणार नाही.”

आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात जशी फलंदाजी केली तशीच लंकेविरुद्ध केली. तो म्हणाला, “वीरेंद्र सेहवाग अशी फलंदाजी करायचा, पण पृथ्वी शॉने कोणतीही जोखीम न घेता आणि २४ चेंडूंत ४३ धावा ठोकला. २०२१मध्ये आत्तापर्यंत पृथ्वी शॉचा जलवा राहिला आहे. विजय हजारे ट्रॉफीमधून आयपीएल आणि आता इथेसुद्धा त्याची कामगिरी जबरदस्त होत आहे.”

हेही वाचा – इशान किशनची गर्लफ्रेंड आहे ‘सुपरहॉट’, ठरली होती ‘मिस इंडिया’ फायनलिस्ट

पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. त्याने विक्रमी ८२७ धावा केल्या होत्या. याशिवाय आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यातही त्याची कामगिरी जबरदस्त होती. श्रीलंका दौर्‍यादरम्यान भारतीय संघाला पृथ्वी शॉकडून मोठ्या आशा होत्या. प्रत्येकाचा असा विश्वास होता, की शॉ या दौर्‍यावर जबरदस्त कामगिरी करू शकेल आणि त्याने पहिल्याच सामन्यात एक शानदार खेळी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aakash chopra praises prithvi shaw after his quick knock against sri lanka adn

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या