scorecardresearch

Premium

T20 World Cup : रोहित शर्मासोबत टी-२० विश्वचषकात ‘हा’ युवा खेळाडू सलामीला येईल, माजी खेळाडू आकाश चोप्राचे मत

Akash Chopra’s Reaction : आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूबवर विचारण्यात आले की यशस्वी जैस्वाल आगामी टी-२० विश्वचषकात शुबमन गिलसोबत ओपनिंग करणार का? या प्रश्नाला आकाश चोप्राने उत्तर दिले.

Akash Chopra's Reaction about Rohit Sharma and Yashasvi Jaiswal
आकाश चोप्राची रोहित शर्माबद्दल प्रतिक्रिया (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Akash Chopra’s Reaction about T20 World Cup 2024 : सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे. या दोऱ्यात भारतीय संघाला टी-२०, वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. यापैकी टी-२० मालिका १० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर हे दोन दिग्गज जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही खेळताना दिसू शकतात. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आगामी टी-२० विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामीचा जोडीदार कोण असेल याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने म्हटले की, यशस्वी जैस्वाल २०२४ च्या टी-२० विश्वचषकात रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकते. त्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांना सलामीला संधी मिळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ऋतुराज गायकवाड शानदार कामगिरी केली होती. गायकवाडने संपूर्ण मालिकेत सलामीला फलंदाजी करत काही चांगल्या इनिंगही खेळल्या. या कामगिरीच्या जोरावर, तो भारतासाठी द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. याशिवाय यशस्वी जैस्वालबद्दल बोलायचे झाले तर, त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात टीम इंडियाला शानदार सुरुवात दिली. जर आपण रोहित शर्माबद्दल बोलायचे, तर त्याने वनडे विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही, पण तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो.

Neil Wagner retires
नील वॅगनर; सळसळत्या चैतन्याची अनुभूती देणारा योद्धा
audience got angry tula shikvin changlach dhada
“अधिपतीला अक्कल…” ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज; म्हणाले, “बायकोवर विश्वास नाही अन्…”
Alastair Cook believes that Joe Root has forgotten the natural game in the sound of baseball sport news
‘बॅझबॉल’च्या नादात रूटला नैसर्गिक खेळाचा विसर -अ‍ॅलिस्टर कूक
Video of Rohit's catch In IND vs ENG 2nd Test Match
IND vs ENG : अश्विनच्या चेंडूवर रोहित शर्माने घेतला पोपचा उत्कृष्ट झेल, फलंदाजही झाला चकीत, पाहा VIDEO

रोहित-आकाश चोप्रासोबत यशस्वी ओपनिंग करणार –

आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूबवर विचारण्यात आले की यशस्वी जैस्वाल आगामी टी-२० विश्वचषकात शुबमन गिलसोबत ओपनिंग करणार का? या प्रश्नाला आकाश चोप्राने उत्तर दिले. तो म्हणाला, “मला असे होईल वाटत नाही, कारण गिलबद्दल बोलायचे झाल्यास ऋतुराज गायकवाडचेही नाव घ्यावे लागेल. तो गिलप्रमाणे फलंदाजी करतो आणि मोठी इनिंग खेळू शकतो. यानंतर तुम्ही ऋतुराजला ठेवू शकता.”

हेही वाचा – Team India : रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहसह ‘या’ पाच भारतीय खेळाडूंचा आज वाढदिवस

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “मला वाटतं की ऋतुराज गायकवाड किंवा शुबमन गिल नाही, पण यशस्वी एका टोकाला असेल तर रोहित शर्मा दुसऱ्या टोकाला खेळेल. रोहित शर्माने खेळण्यास नकार दिला असेल, असे मला वाटत नाही. राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवला असून रोहितही खेळू शकतो.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: According to akash chopra yashasvi jaiswal and rohit sharma can open for india in the upcoming t20 world cup 2024 vbm

First published on: 06-12-2023 at 14:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×