scorecardresearch

VIDEO: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलपूर्वी रोहित शर्माने आपल्या सहकाऱ्यांचे केले कौतुक; म्हणाला, “प्रत्येक प्रसंगी एका…”

WTC Final 2023: ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर या तीन प्रमुख खेळाडूंशिवाय भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळायला उतरेल. हे तिन्ही खेळाडू जखमी झाले आहेत.

BCCI Shares Rohit Sharma Video
रोहित शर्मा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

IND vs AUS WTC Final 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचला आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत खेळला जाणार आहे. या सामन्याला ७ जून पासून ओव्हलवर खेळवला जााणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत, तर काही खेळाडू अजून आयपीएल २०२३ मध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रोहित शर्माने भारतीय संघाला एक खास संदेश दिला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित शर्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. बीसीसीआयने वेबसाईटवर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित म्हणाला, “साऊथहॅम्प्टनमध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर आम्ही लगेच एकत्र आलो आणि पुढच्या सायकलची तयारी सुरू केली.” तो म्हणाला, “मला वाटते की, आम्ही या सायकलमध्ये खरोखर चांगले क्रिकेट खेळलो. अनेकवेळा आव्हाने आमच्यासमोर आली आणि त्यावर मात करण्यासाठी काही खेळाडूंनीच नव्हे, तर सर्वच खेळाडूंनी मोठा उत्साह दाखवला.”

रोहितने २०२१ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याच्या निराशेनंतर नेत्रदीपक पुनरागमन करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. तो म्हणाला, “हे दोन वर्षांचे चक्र आहे आणि या काळात आम्ही बरेच कसोटी सामने खेळलो. या चक्रात अनेक खेळाडू खेळले. प्रत्येक प्रसंगी एका खेळाडूने जबाबदारी सांभाळली. आम्हाला त्याच्यांकडून ज्या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होती, त्याने तशीच कामगिरी केली.”

ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर या तीन प्रमुख खेळाडूंशिवाय भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश करेल. हे तिन्ही खेळाडू जखमी झाले आहेत. रोहित व्यतिरिक्त, फक्त पंत आणि अय्यर यांनी पहिल्या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये प्रति डाव ४० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बुमराहने त्या कालावधीत १० सामन्यांमध्ये ४५ बळी घेतले आहेत.

हेही वाचा – IPL 2023: फायनलपूर्वी एमएस धोनीने घेतली पथिराणा कुटुंबाची भेट, मथीशाची बहीण फोटो शेअर करत म्हणाली, “मल्ली सुरक्षित…”

डब्ल्यूटीसी फायनल २०२३ फायनलसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या