IND vs SL1st ODI Update: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाला टी-२० मालिकेत २-१ ने पराभूत केल्यानंतर आता वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करत आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत भारतीय संघ विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

आता रोहित अँड कंपनीसमोर लंकन संघाचे आव्हान असेल. पण हा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे बघायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?

मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज (१० जानेवारी) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक एक वाजता होईल.

पहिली वनडे कोठे खेळला जाईल?

भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामना गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे.

कोणत्या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिला वनडे लाईव्ह पाहू शकता. तसेच, डीडी फ्री डिशच्या डीडी स्पोर्ट्स चॅनलवर तुम्ही सामना विनामूल्य पाहू शकता.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: “टी२०चा कर्णधार अजूनही मीच, हार्दिक ही तात्पुरती सोय…” रोहित शर्माने BCCIला दिला इशारा

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता?

तुम्ही डिस्ने हॉटस्टार अॅपवर तसेच त्याच्या वेबसाइटवर भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

असे असेल हवामान –

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात हवामान उबदार असेल (IND vs SL 1st ODI Weather Report). हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुवाहाटीमध्ये 10 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन तापमान २७ अंशांवरून १७ अंशांपर्यंत खाली येईल. अशा स्थितीत पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पावसामुळे खेळाची मजा काही बिघडणार नाही, असे मानले जात आहे.

या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा –‘क्रिकेट फिटनेस महत्त्वाचा, YO-YO आणि Dexa Test नाही…’सुनील गावसकर यांनी BCCIच्या निवड योजनेवर केले प्रश्न उपस्थित

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंकेचा संघ: दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, आविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, अशेन बंदारा, महिष तिक्ष्ण, चमिका करुणारत्ने, नुस्का, नुस्का, राजुस, राजुस, डी. दुनिथ वेलालगे, प्रमोद मदुशन आणि लाहिरू कुमारा.