scorecardresearch

IND vs AUS: ‘हे दुःख मला आयुष्यभर सतावत राहील…’; कसोटी मालिकेला मुकलेल्या ‘या’ धडाकेबाज खेळाडूचे वक्तव्य

Border Gavaskar Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तत्पुर्वी एका धडाकेबाज खेळाडूने या मालिकेचा भाग होता न आल्याने निराशा व्यक्त केली आहे.

Border Gavaskar Test Series Updates
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरू होत आहे. यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. दोन्ही देशांनी पहिल्या दोन सामन्यांसाठी आपल्या संघांची घोषणा केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल भारत दौऱ्यावर येणार नाही. कारण त्याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेले नाही.

मॅक्सवेल यांनी हे विधान केले –

भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेचा भाग नसल्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, ”दुखापतीमुळे आगामी भारत दौऱ्यात न खेळणे मला आयुष्यभर त्रास देईल.” ‘बिग बॅश लीग’च्या सामन्यादरम्यान ‘फॉक्स क्रिकेट’वर कॉमेंट्री करताना मॅक्सवेलने हे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – IND vs NZ 2nd T20: आज सूर्यकुमारच्या रडारवर असणार एबी डिव्हिलियर्सचा विक्रम; ‘हा’ कारनामा करण्याची सुवर्णसंधी

ग्लेन मॅक्सवेल म्हणाला, ”माझ्या सहकाऱ्यांना विशेषतः भारतात खेळताना पाहण्याची संधी मिळणे चांगले आहे. मला वाटते की त्यांना (ऑस्ट्रेलिया) भारत दौर्‍यासाठी सर्वोत्तम संघ सापडला आहे.” मॅक्सवेलने आपल्या कारकिर्दीत फक्त सात कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ भारताविरुद्ध खेळले आहेत. २०१३ आणि २०१७ मध्ये भारतीय भूमीवर खेळलेल्या कसोटी मालिकेत तो कांगारू संघाचा भाग होता.

मॅक्सवेलला गेल्या वर्षी झाली होती दुखापत –

ग्लेन मॅक्सवेल दुखापतीशी झगडत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेमुळे मॅक्सवेलला काही महिने क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. सध्या तो रिकव्हरी करत आहे.

हेही वाचा – Hockey WC 2023 Final: जर्मनी आणि बेल्जियममध्ये आज अंतिम सामना; हेड टू हेड रेकॉर्डसह सामना कुठे पाहता येणार पाहा

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरश्रक), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी , मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:04 IST
ताज्या बातम्या